Friday, March 1, 2013

अरे वोही लड़की...वोही लड़की....


Weekend संपून सोमवार आला.. सकाळी ७.१५ चा गजर झाला... मी उठलो... ऑफीस ला जाण्यास तयार होऊ लागलो... स्नान वगैरे केल मग दुपारचा डब्बा पॅक केला... बातम्या लावल्या... ८.४५ होतात... निघतो ऑफीस कडे... जाताना खूप सारे जन भेटतात... भेटतात म्हणजे काय फक्त बाजूने निघून जातात... त्यांची सुद्धा कॉलेज, ऑफीस किंवा बस स्टॉप कडे जाण्याची धावपळ चालूच असते... around ८.५५ ला ऑफीस मधे पोहोचतो... मग ५.३० पर्यंत तेच ऑफीस ऑफीस खेळतो.. वापस घराकडे जाण्याची तयारी... जाताना सुद्धा बरेच जन भेटतात... या वेळेस त्यांची लगबग असते ती लवकर ट्रेन किवा बस पकडण्याची... मी घरी पोहोचतो... परत तेच आपले so called Social Networking...मग स्वयंपाकाची तयारी.. जेवण करताना एखादी सीरियल चालू करतो Laptop वर.. ती संपे पर्यंत जेवण सुद्धा होत... मग शांत गाणे ऐकायचे आणि शतपावली करायची... १०.३० वाजतात आणि बेडरूम चा लाइट बंद होतो... दिवस संपतो..
असाच मंगळवार येतो मग बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार... आणि आठवडा जातो... ही दैनंदिनी चालूच असते... म्हणजे तेच... सकाळी ७.१५ ला उठने... तयार होऊन ऑफीसला जाणे... जाताना बर्‍याचश्या अनोळखी पण ओळखी लोकाना भेटणे.. परत तेच ऑफीस काम संपले की back to home... परत त्याच अनोळखी लोकाना भेटणे... आणि तेच routine...असे एक चाकोरीबद्ध जीवन... ज्याची मला सर्वात जास्त चीड आहे ही एक सप्रेम भेट दिलीय मला लीड्स ने...चाकोरीचे खरडुन कागद सहिस पाठवणे ह्या बाहेर काही नाही...
ह्या framed routine मधे एक गोष्ट मस्त होते... जाता - येता जे लोक भेटतात त्यांच्या सवयी कडे लक्ष्य देण्याची सवय मला लागली... लिफ्ट मधून खाली येताना दोन मुली त्याच वेळेस सोबत असतात... जो पर्यंत बस स्टॉप जवळ पोहोचतो तेव्हा तिथे एक छोटी मुलगी आणि तिची आई थांबलेले असतात...ती मुलगी नेहमी काहीतरी बडबडत असते... खेळत असते... तिला क्रॉस केला की एक मुलगा माझ्या opposite direction ला जात असतो... तो football player Nani चा छोटा भाऊच दिसतो....तो सुद्धा त्याच्या तन्द्रित.. काही तरी ऐकत आणि गात असतो... आता तो फोन वर बोलतो का गाणे गुणगुणतो हे अजुन समजले नाही...
इथे येई पर्यंत त्या लिफ्ट मध्ये सोबत असलेल्या मुलीनी साथ सोडलेली असते... मग मी आणि मयूर... थोडेसे समोर गेले की एकानंतर एक अश्या परत दोन मुली भेटतात... मग मी आणि मयूर एकमेकाना त्यांच्या वरुन चिडवतो... तेरीवाली अन् मेरीवाली... पण ह्या दोघींपैकी संध्याकाळी जाताना कोणी भेटत नाही... मग त्या वेळेस जर कोणी दिसले तर आमचे चालू होते... वोही लडकी वोही लडकी....
या सगळ्यातून थोडासा आराम भेटतो तो weekend ला.... काहीतरी activities चालू असतात... क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन किवा कुठे तरी फिरून येणे... एक बरे आहे की या वर्षी काही चांगले मित्र भेटले.. नाहीतर जगात सर्वात चू****** लोक मला इथे लीड्सला भेटले... एक एक प्राणी नमूना... त्यांच्या वर लेख लिहीत बसलो तर कदाचित एक पुस्तक तयार होईल... असो...
बरेच दिवस झाले ती मेरीवाली दिसली नाही... म्हणून पोस्ट लिहावीशी वाटली...
बाकी तर.. Life is Beautiful...

हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...

आपलाच

अभि

Keep Smiling... Be Happy n Always


No comments:

Post a Comment