Thursday, May 15, 2014

फिर से उड चला...

मागचे काही महिने blog लिहीणे बंद होते... कारण ही तसेच होते म्हणा.. माझ्या एकटेपणाने मला blogger बनवले होते.. पण मागचे ४ महिने भारतात होतो.. आई दादा ताई सर्वांसोबत... एकटे असण्याचा प्रश्नच नव्हता...पुतणे आणि भाचे आजुबाजुला खेळायला... 'अभि मामा किती मस्तीखोर आहेस तु' ही आज पर्यंत ची सर्वात best compliment मला त्याच वेळेस भेटली... मस्त दिवस होते...

८ जानेवारीला leeds सोडले आणि सुट्ट्या चालु झाल्या.. मग काय भारतात आल्यावर नांदेड बिलोली पुणे मुम्बई शिवनेरी संगमनेर... महाराष्ट्र दौराच झाला.. आता singapore ला shift झालोय..  Hopes regular असेल blog वर... पण chances कमी आहेत कारण मला प्रवास करताना blog लेखन केलेले आवडते.. UK मधे असताना atleast कुठे फिरायला गेलो तर वेळ मिळायचा... Singapore आहेच आपल्या पुण्याएवढे, फिरायला जायचे म्हटलं तरी अर्ध्या तासात दुसरे टोक गाठु शकतो...

तर आज लिहीण्याचे कारण 'फिर से उड चला'... बरेच जण विचारत होते की बाहेर रहायचे होते तर भारतात का आलास... UK मधे राहुन 3 वर्षे झाली होती, तेच weather तीच लोक, तेच तेच life schedule... बोर झालो होतो... असे वाटु लागले की सगऴ तिथेच थांबलय... मला वाटत माझा स्वभाव 'ये जवानी है दिवानी' मधल्या रणबीर कपुरच्या character सारखा आहे.. मै चलना चाहता हु, दौडना चाहता हु, गिरना चाहता हु, फिरसे उठके भागना चाहता हु, बस रुकना नही चाहता... कदाचीत राशीवर गेलाय स्वभाव माझा...मिथुन रास माझी... चंचल स्वभाव आणि change पाहिजे life मधे..so निघालो...वैसे भी किसीने सही कहा है, कही पोहोचने के लिये कही से निकलना पडता है सही time पे कट लेना चाहिए वरना गिले शिकवे बढने लगते है... 

भारतात ही राहु शकलो असतो.. Actually त्याच इच्छेने आलो होतो... विचार होता स्वत: चे काहीतरी चालु करावे... पण मागच्या ३ वर्षात इथे बरच काही change झाले आहे.. तिथे ज्याला कोणालो भेटलो सगळे आपआपल्या आयुष्यात इतके busy की time च नाहीये त्यांच्याकडे... आईला सोडले तर सगळे जण busy... Disappoint झालो...  म्हटल असच जर असेल तर भारतात राहणे काय व बाहेर राहणे काय.. सर्व सारखेच... आणि एक विचार ही होता खुप लहानपणापासुन की जगात २००+ देश आहेत.. १० तरी देश बघावे.. So दुसरा Singapore choose केलं....बघावे इकडे काही दिवस... नंतर पुढचा destination... 
बाकी Singapore बद्दल बरेच लिहायचे आहे ते next blog post मधे...


पुढे काय होईल ते देव जाणो एक गोष्ट मात्र नक्की आहे
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवायचे आहे... 

आपलाच
अभि


Keep Smiling... Be Happy n Always Remain So...