Thursday, February 12, 2015

...क्योंकी असली मजा तो सबके साथ आता है

लग्नाचा season चालु झालाय.. प्रशांतच्या लग्नासाठी सुट्टी काढली व ७ फेब्रुवारी ला लातुरला पोहोचलो... प्रशांत माझा मावस भाऊ.. लग्न घरी लगबग चालु होती.. मावशी अन मामाची मुले जमली होती.. सगळे आम्ही एकाच वयाचे.. फार तर फार एक-दोन वर्षाचा फरक... लहानपणापासुन, दिवाळीची वा उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की सगळे आजोळी बिलोलीला भेटायचो... Group इतका मोठा आहे की cricket खेळताना players कधीच कमी पडले नाही... 

बिलोलीचे किस्से तर अनेक आहेत... सकाळी सकाळी लवकर उठुन दादा(आजोबा) सोबत शेतात जायचे.. विहीरीमध्ये मस्त पोहायचे... खुप मजा चालायची... बैलगाडीत बसुन जाण्याची ती मजा व त्या प्रवासाची सर आजच्या aeroplane च्या सफरीला सुद्धा नाही... सर्वात जास्त मी काय miss करतो तर रात्री गच्चीवर आकाशातील चांदण्या तारे बघत गाण्याच्या भेंड्या खेळणे... अंधारात घाबरत घाबरत भुतांच्या गोष्टी करणे...
हळुहळु सर्व मोठे झाले.. कोणाची exam तर कोणाला office मधे काम.. So बिलोलीला येण कमी झाले... परवा जेव्हा हैदराबादहुन बिलोलीला घरी गेलो तेंव्हा सगळ्या आठवणी ताज्या झाल्या... मोठी आई लग्न घरी लातुरला असल्याने तिचा पलंग रिकामा दिसला आणि डोळ्यात खळ्ळकन पाणी आले... मोठी आई अन दादांशिवाय बिलोली imagine नाही करु शकत मी... त्या दोघांनी एकत्र बांधुन ठेवलय आम्हाला.. आम्हा बच्चे पार्टीचा खुप जीव आहे त्यांच्यात... दादा जाऊन १० वर्ष झाली but i am yet to accept the fact... I just don't want to accept it.. This is just typical me.. I can't accept losing my people..

इकडे लातुरला लग्नघरी अशीच एक छोटीशी मैफलच जमली होती... मग वराती सोबत लग्नाच्या ठिकणी
जाताना बस मधे केलेला dance लहानपणीच्या सहलीची आठवण देऊन गेला... लहानपणी दादा आम्हा सगळ्यांना घेऊन कोणत्यातरी गावाला घेऊन जायचे.. कधी तुळजापुर पंढरपुर तर कधी निरा नरसिंगपुर गोंदवले आणि कधी मंत्रालय तिरुपती ... सगळ्यांसोबतच्या या सहलीची मजाच काही अौर असायची... 

मागच्या ५ वर्षापासुन बाहेर असल्याने हे सगळे miss करतोय.. Family शिवाय एकटेच वेगवेगळे देश फिरतोय.. तिथे गेलो की वाटते इथे आपली माणसे असायला हवी होती... क्योंकी असली मजा तो सबके साथ आता है...

३१ जानेवारीला नितेशचे लग्न होते हैदराबादला.. नितेशची joint family आहे.. माझे आणि आणखीण एका मित्राचे खुप छान स्वागत केले त्यांनी.. अगदी एका family member सारखे treat केलं.. त्याचे लग्न झाले की next day नितेशकडे एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता जिथे त्याच्या आजोबांनी सर्व छोट्यांना as a token of love एक पाकीट दिले ... त्या मध्ये काही पैसै व एक चिठ्ठी होती... चिठ्ठीवर खुप सुंदर आशिर्वाद लिहीले होते आणि देवाकडे प्रार्थना केली होती की माझे हे कुटुंब सदा असेच हसत खेळत आनंदी व एकत्र राहो...

तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना करुन हा लेख संपवतो...
तुम्ही सुद्धा हसा खेळा मस्त जगा...

आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...