नवीन वर्ष नवीन सुरुवात... ३६५ पानांची नवीन वही परत एकदा उघडुन श्रीगणेशा करायचा... नवीन रस्ते नवीन वाटा काबीज करत नवनवीन ध्येये गाठायची... दर वर्षीच हे होत.... १ जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत करुन या वर्षी काहीतरी वेगळे करायचे हे ठरवतो व काही so called resolutions सुद्धा करतो...
वर्षे जातात अन् येतात... काळ काही थांबत नाही... शेवटचा दिवस आला की मग वर्ष भराचा हिशोब लावायला सुरुवात होते... जुनी आणि जीवाभावाची नाती तुटतात.. त्याची उणीव पुर्ण करण्यास नवीन नाती आयुष्यात येतात..जुने ते सोनंच असते असे बरेच वेळेस वाटते... . नवीन नात्यात आपण जुना गोडवा शोधण्यास जातो आणि काही वेळेस मृगजळच हाती लागते... पण म्हणुन काही आयुष्य थांबत नाही... आणि वेळही नाही... ते तसेच चालु रहाते, किंवा राहु द्यावे लागते... नवीन गोष्टीच्या स्वागतासाठी व नवीन सुखाच्या शोधासाठी...
तसे माझ्याबाबतीतही झाले... २०१२ ने मलाही असे बरेच काही दिले...मागच्या वर्षभरात खुप काही घडले... खुप नवीन ठिकाणे फिरलो...बरेच नवीन मित्र मिळाले तर काही जुने दुर गेले... नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या आणि काही राहूनच गेल्या...
Leeds मधे settle झालो rather थोडा रुळलो... वर्षाची सुरुवात एकदम छान london fireworks ने झाली..was one of the best days of life... मग जुनैद व अहसान, मलेशिया व लंडनला shift झाले... Leeds मध्ये मानव व मयुर सारखे मित्र भेटले...cornwall ची मस्त trip झाली, वर्ष सरता सरता liverpool सुद्धा पाहुन झाले... Wimbledon व olympic ची मजा सुद्धा लुटली... खुप सारी स्वप्ने पुर्ण झाली... पण काही इच्छा अधुर्याच राहील्या... Guitar n harmonica शिकण्याचे अर्धवटच राहिले...अजुन edinburgh n highlands explore करायचेच आहे... Charity work सुद्धा चालु करायचे आहे...
नवीन वर्षात ह्याच अधुर्या गोष्टी पुर्ण करायच्या आहेत.. नवीन मित्र मिळवायचे आहेत.. नवनवीन ठिकाणे explore करायची आहेत.. एखादे तरी वाद्य शिकायचे आहे...
तुमचेही असेच काहीतरी ठरले असेल नं.. तेव्हा त्यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना समाधानाचे, सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना...
हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always
No comments:
Post a Comment