Saturday, July 12, 2014

तकिया कलाम...

New job, new place, new people.... Singapore  ला आल्यापासुन बरेच काही नवीन बघायला भेटत आहे... इकडचे लोक त्याच्या सवयी, इथली संस्कृती, खाणे पिणे... बरंच काही वेगळं आहे... England च्या cold n dry weather मधुन इथल्या hot n humid weather येताना खुप सार्‍या गोष्टी नवीन वाटल्या... सगळ्यात change वाटला तो लोकांच्या बोली भाषे मधे... I mean मी Chinese language ची गोष्ट नाही करत आहे तर English बोलण्या बद्दल सांगतोय... 
 
 England मधे असताना प्रत्येक वाक्यात Hello mate, hello love, cheers, या पैकी काही तरी ऐकायला यायचे... इथे प्रत्येक वाक्याच्या शेवटी लोक la जोडतात.. What la? It's not like that la Sorry la... मग कधी कधी वीट येतो त्याचा.. म्हणजे फक्त Singaporeans or Chinese लोकंच नाही तर इथे असलेले Indians सुद्धा.. वाटतं अरे काय la.. च्यायला.. एखादी गोष्ट adopt करायची तर चांगली गोष्ट adopt करा ना.. 

इथे रोज office मधे सुद्धा मी तकिया कलाम observe करत असतो.. माझ्या manager ला pet words use करण्याची आहे.. कोणतेही वाक्य असो तो start करतो there are two of things , one..... Two... आणि दुसरा word 'meaning'.. E.g. Meaning i am trying to tell u.. Meaning what i want to convey is.. Meaning... Meaning... मग वाटते अरे बाबा किती वेळा meaning म्हणणार.. बस ना आता..

माझा group मधे 2 colleagues आहेत त्यातल्या एकाला प्रत्येक वाक्यात basically तर दुसर्‍याला actually म्हणण्याची सवय आहे.. प्रत्येक वाक्य actually n basically ने start करतात... I am not exaggerating... ते ऐकायला इतके odd वाटते ना.. आणि त्यात वाक्य छोटे छोटे असले ना मग तर फक्त actually n basically ऐकायला येत... हा इकडून actually आणि तो तिक्डुन basically...

Cricket teams मधे सुद्धा तकिया कलाम observe करायला भेटतात.. धोनी आणि रोहीत शर्मा, दोघेही  you know , you know इतक्या वेळेस use करतात ना कि कधी कधी वाटत ते UNO चे brand ambassador आहेत.. 

मी पण या बाबतीत मागे नाहीये पण माझे तकिया कलाम people n time वर depend करतात.. आधी आमच्या DX group सोबत गप्पागोष्टी करायचो तेव्हा एक वाक्य नेहमी बोलायचो.. खोट सांगत नाही शाम्या खरं सांगतो.. मग शाम म्हणायचा अबे आम्ही कधी doubt घेत नाही तुझ्यावर.. ही post लिहीण्याचं एक मोठ्ठ कारण हे वाक्य.. परवा अशीच group chatting चालु होती आणि हे वाक्य अचानक आले... आणि शाम म्हणाला hey abhya is back.. आणि आम्ही सर्व खळखळुन हसलो... माझे recently जे interviews झाले त्यावेळेस माझे actually n basically use करण्याचे प्रमाण वाढले होते..

तुम्ही सुद्धा लोकांना त्याचे pet words or तकिया कलाम use करताना ऐकलं असेल.. तेव्हा तुमचे experience इथे comment करायला विसरु नका... 

ह्या छोट्या छोट्या गोष्टी observe करायला मला खुप मजा येते...
तुम्ही सुद्धा हसा खेळा मस्त जगा...



आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

No comments:

Post a Comment