"या वर्षी उन खूप आहे" कालच आई म्हणत होती... मी म्हणालो "मे महिना चालु झालाय आता तर झळा आणखीण वाढतील"... दरवर्षी असेच होते, मे महिना आला की गर्मी वाढते आणि उन्हाळ्याबद्दल चर्चा चालु होतात... पण मे महिना हा आणखीण दोन गोष्टींशी निगडीत आहे.. सुट्टया आणि बालपण...
माझे माध्यमिक इयत्तेतील शिक्षण सगरोळीला सैनिक शाळेत झाले... मी आणि सोनु(मामाचा मुलगा), दोघे तिथेच होतो... आमची शाळा निवासी होती... १मे ला निकाल लागायचा आणि सुट्ट्या चालू... मग महिनाभर ना PT ना अभ्यास.. ना कोणी रागावणारे ना कोणी शिक्षा करणारे... मज्जाच मजा...त्या काळी दादांकडे ( आम्ही आजोबांना दादा म्हणत असु) एक जीप होती, Commander... आई, मामी आणि मामा व सोबत घरचे चिल्ले पिल्ले...सगळे आम्हाला घेऊन जायला शाळेत यायचे व आम्ही लगेच घरी निघायचो...... आम्ही नेहमी complaint करायचो की शाळेतुन घरी जाताना घर लवकर नाही येत पण तेच सुट्टया संपल्यावर शाळेत येताना, शाळा खुप लवकर यायची...
सुट्टयामध्ये मी बहुतेक वेळ बिलोलीला असायचो... बिलोली, माझे आजोळ, तालुक्याचे ठिकाण.. आजी आजोबा मामा मामी तिथे असायचे... सुट्टयामध्ये आम्ही सगळी भावंड तिथेच जमा़यचो... मला ४ मामा व ३ मावश्या... त्यामुळे group ही तसा मोठाच.. १०-१२ जणांचा..
सकाळी लवकर ६ वाजता उठुन दादांसोबत मळ्यात जायचो.. ़संपुर्ण शेतावरुन एक चक्कर मारायची... पेरु, कैरी, चिंचा, बोरं, इंग्लिश आवळे वगैरे वगैरे खाउन झाले की मोर्चा विहीरीकडे वळायचा...शेतातील विहीर चांगलीच खोल होती, दादा एका गडी माणसाला आमच्यावर लक्ष ठेवायला सांगायचे आणि पुन्हा एक चक्कर मारण्यास निघुन जायचे... आम्ही सगळे पोहणं इथेच शिकलो...मनसोक्त पोहुन झाले की स्वारी वापस घरी निघायची ... जाताना मस्त इडली वड्या वर ताव मारायचा... घरी गेल्यावर सुद्धा साल पापडं, बोराच्या वड्या आणि महत्वाचे म्हणजे आंबे, या सगळ्यावर डोळा असायचाच... मग दिवसभर घरातच cricket खेळायचो... दादा नेहमी रागवा़यचे.. तेव्हा थोडावेळ शांत बसा़यचो... दादा बाहेर गेले की पुन्हा चालु...दिवस कसा निघून जायचा या कडे लक्ष्यच नसायचे...रात्रीचे जेवण झाले की सगळे जन गच्चीवर जायचो, तिथे मग पत्ते, अंताक्षरी, गप्पा रंगायच्या... थंड वातावरणात मोकळ्या आकाशा खाली मग झोप कधी लागायची हे कळायचेच नाही
नृसिंह जयंती ही उन्हाळ्यात असते.. त्या दिवशी आमच्याकडे मोठी पुजा असते... त्या दिवशीचा स्वयंपाक म्हणजे माझा सगळ्यात आवडता...मसालेदार वांग्याची भाजी, भरडा भाजी, पुरी, साधं वरण, भात आणि पन्हं, आंब्याचा रस... वाह, आता लिहीतानाही तोंडाला पाणी सुटतय...
आजकाल मात्र विचित्रच झालंय.. सुट्टया म्हणजे फक्त weekend होउन बसल्यात.. पैसे कमवायाच्या नादात कुठे तरी ते बालपण miss करतोय...मोकळ्या आकाशाखाली, गच्चीवर झोपून तर किती दिवस झाले ते ही आठवत नाही... अंताक्षरी आणि पत्ते तर दूरच पण सगळ्याना एकत्र मिळून बोलण्यास google hangout use करावे लागते...
खरच लहानपनीच्या आठवणी किती सुंदर असतात ना...
पण कोणीतरी म्हणालय़..Embrace you past but live in present..
So, हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा...
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...
No comments:
Post a Comment