Monday, July 2, 2012

Hello मी London Underground बोलतेय...

Title वाचुन लहानपन आठवले ना.. मराठीचे शिक्षक निबंध लिहायला सांगायचे... तसाच काहीसा हा प्रयत्न... खुप वर्ष झालेत शेवटचा निबंध लिहुन तेव्हा चुक भुल माफ असावी

मागच्या आठवड्यात London ला गेलो होतो... London आणि Mumbai या दोन्ही शहरात बरीचशी साम्ये आहेत... एक europe ची आर्थिक राजधानी तर दुसरी भारताची... दोन्ही शहरांची लोकसंख्या खुप जास्त... Top 10 most populated cities in the world च्या list मधे दोन्ही शहरांचा नंबर लागतो... जसे Mumbai मधे भारतातल्या प्रत्येक राज्यातील लोक दिसतात तसेच London मधे वेगवेगळ्या देशातील लोक भेटतील... या सारखीच अजुन एक common गोष्ट म्हणजे local trains... London मधे त्यांना underground  म्हणतात... जशी local trains मुंबईची जान आहेत तसेच underground लंडन ची.... London मधे असताना underground ने प्रवासाची ही गोष्ट..

 
Boaggie in a Tube
रविवारी Queen ची jubilee ceremony, सोमवारी british museum enjoy करून झाले.. मंगळवारी परतीचा प्रवास चालु केला... Osterly station ला गेलो... Station वर जास्त गर्दी नव्हती... बहुतेक लोकांनी long weekend* ला घरीच बसुन आराम करावा असे ठरवले असावे.. king's cross ला जाणारी piccadily line underground पकडली आणि एका रिकाम्या बोगीमधे जाउन बसलो...  King's cross station येण्यास अजुन एक तास होता.. कानाला headphones लावले आणि गाणे ऐकत बसलो... गाणे आवडीचे असल्याने आवाज थोडा मोठा होता...

तेवढ्यात एक जोरात आवाज आला "आवाज थोडा कमी करा"...असा मोठा आवाज ऐकल्यावर प्रथम भिती वाटली... मग परत एक आवाज.. "Hello मी London Underground बोलतेय... Please गाण्याचा आवाज हळु करा".. मी पहिल्यांदाच एका train ला बोलताना ऐकत होतो म्हणुन घाबरलेलो..."रोज सर्वांना मोठ्याने गाणे ऐकत असते आज वाटले की स्वतः ही जरा मोठ्याने बोलुन बघावे.. मग कळेल की बाकीच्यांना त्याचा किती त्रास होतो ते"... गाणे बंद केले आणि train च्या बोलण्याकडे लक्ष देउ लागलो...

Piccadily Line
माझे नाव piccadily underground... माझी स्थापना १९०६ मधे झाली.. रोज न थकता प्रवाश्यांना heathrow terminal 5 किंवा Uxbridge ते cockfosters station घेउन जात असते... Piccadily circus, covent garden, Harrods, Buckingham palace, Arsenal FC, King's Cross ह्या सर्व पर्यटन स्थळांना जाण्यास प्रवासी माझा उपयोग करतात...Queen ची crown ceremony पासुन ते diamond jubilee पर्यंत तिच्या सर्व प्रवासाला मी साक्षी आहे..  दोन्ही महायुद्ध असो वा recently २००७ मधे झालेले terrorist attacks असो या विनाशालाही मी अगदी जवळुन पाहिलय... London bridge is falling down कविता ऐकली असेलच... तो पडताना सुद्धा मी बघितलाय... माझे काम २४ तास ७ ही दिवस चालु असते... उनपाउस असो वा london ची हिवाळ्यातली गारेगार थंडी असो... मी नेहमी प्रवासी सेवेस तत्पर असते... 

London Tube Map
अहोरात्र सेवा करुनही मला तुम्ही माणसे नावे ठेवत असता..  मी वेळेवर काम करत नाही.. बोगी स्वच्छ नसते.. ह्या ना त्या कारणाने blame करण्याची सवयच लागली आहे तुम्हा लोकांना... एकदा काय झाले की neat maintainance न केल्याने मी स्टेशनवरच बंद पडले.. प्रवाशांना कामावर जाण्यास उशीर होउ लागला त्यातील काही जण मग मलाच रागावु लागले.. त्या आधीच्या आठवड्यात drivers नी strike केली होती.. तेंव्हा सुद्धा लोकांचा राग माझ्यावरच.. मला चालवणारी तुम्ही माणसेच... Seats ना chewing gum चिटकवुन खराब करणारी तुम्ही माणसेच... Chips packets व alcohol bottles चा कचरा करणारे सुद्धा तुम्हीच... तरीही तुम्ही मला का नावे ठेवता?

पण या सगळ्यात काही चांगली माणसे सुद्धा भेटतात.. कधी कोणाची एखादी हरवलेली वस्तु सापडली असेल तर ती lost n found center वर आणुन देतात.. वडीलधारी आणि म्हातारी व्यक्ती उभे असेल तर त्यांना बसण्यास जागा देतात.. काही कलाकार मंडळी, मग तो लेखक असो वा गायक कवी असो वा mimicry artist, कलाकृती माझ्या सोबतच पहिल्यांदा share करतो... काही जणांना त्यांची कला प्रेक्षकांसमोर सादर करण्यास train म्हणजे एक चांगला platform भेटतो तेव्हा मनाला एक वेगळेच समाधान वाटते ... काहीजण त्यांची सुख दुःख माझ्या जवळ सांगतात तेव्हा मी शांतपणे सोबत असते... त्यांच्या जीवनातले चढ उतार ऐकुन कधीकधी वाटते आपणही सजीव असतो तर...

काल परवाचाच एक incident... एका माणसाने माझ्यासमोर येउन आत्महत्या केली.. सगळी वाहतुक ठप्प झाली होती.. बाकीच्या प्रवाशांना त्याचा त्रास झाला.. खुप वाइट वाटले... विचार केला की time machine असती तर भुतकाळात वापस जाऊन त्याला वापस आणले असते व चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन त्याला दाखवले असते की जीवन किती सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया..

King's Cross Station
Train हे सगळे खुप आत्मीयतेने सांगत होती व मी पण त्यात मग्न झालो होतो... तेवढ्यात एक announcement झाली "the next station is King's Cross...blah blah blah..."... तेव्हा train ला पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने गाणे न ऐकण्याचे आश्वासन देउन मी station वर उतरलो...

पण मनात अजुनही train चे बोलणे घुमत होते...
जीवन सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया


आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...


*jubilee event मुळे सोमवारी व मंगळवारी सुद्धा सुट्टी होती

No comments:

Post a Comment