Saturday, August 1, 2015

३ Idiots

३ ईडियट्स... मस्त movie आहे... मस्त स्टोरी आहे... जीवाला जीव लावणारे मित्र...एक सीन मधे रँचोने जावेद जाफरीला सांगितलेलं असतं .. मै तो किसिको नही मिलूँगा, पर २ ईडियट्स आएँगे मुझे ढूँढने तब क्या करोगे.. प्रत्येकाच्या लाइफ मधे अशे काही मित्र असतात जे आपल्यावर खूप जास्त प्रेम करतात... माझ्या life मधीलसुद्धा अशेच 2 idiots आहेत... राहुल अन सोनु...  एक मावशीचा तर दुसरा मामाचा मुलगा... पण ह्यांची सोबत म्हणजे मित्रासारखी... अगदी लहानपणी पासुन आम्ही सगळ्यागोष्टी सोबतच केल्या आहेत... कदाचीत ह्यांच्यामुळेच मला कधीही मित्रांची उणीव भासली नाही... Bollywood वाले सुद्धा मित्राबद्दल फिल्म बनवताना ३ जणच दाखवतात... दिल चाहता है असो किंवा जिंदगी ना मिलेगी दोबारा... ३ इडियट्स असो वा काई पो छे... तशीच काहीशी chemistry आमची आहे... आम्ही तिघे सोबत आहोत तर गडबड गोंधळ चालुच असतो आणि सभोवताल जर शांत असेल तर मग नक्कीच काहीतरी problem असेल... 

मी आणि सोनु एकाच वयाचे तर राहुल २ वर्ष मोठा... लहानपणापासुन तिघेही सोबत.. खेळ असो वा अभ्यास... सगळी मजा मस्ती सोबतच केली... 

राहुल .. आम्हा तिघात मोठा पण कधीही दादा म्हणालो नाही त्याला किंवा त्यानेही दादागिरी केली नाही... स्वभावाने एकदम दिलफेक माणुस.. मित्राला जीव लावणारा.. माझ्यासाठी तर सर्व सोडुन लक्ष देणारा... एकदा काय झाले मी सहजच call केलेला.. हा hero त्याच्या manager सोबत meeting मधे busy... जसा माझा call आला.. Meeting थांबवली म्हणाला sir important call आहे avoid नाही करु शकत... तुम्ही थांबा..  मग काय माझा कोणताही call असो हा हातातली सगळी कामं बाजुला ठेउन माझ्याकडे लक्ष्य देतो..  मला कावीळ झालेला असताना त्याने माझी घेतलेली काळजी असो वा मी देशाबाहेर असताना आईची काळजी... त्याच्या सोबतचा गणपती dance असो वा drive करताना त्याला दिलेला त्रास असो... कधीही complain केली नाही त्याने... जगात सर्वात जास्त मी कोणाला त्रास दिला असेल तर तो हा... आमचे मित्रमंडळही commanach... माझ्या सर्व चांगल्या मित्रांना राहुल माहिती आहे... Rather only if you are a good friend of mine then i will introduce you to Rahul... 

सोनु.. माझ्या मामाचा मुलगा.. But सख्ख्या भावा पलिकडले नाते.. कधीही काही share करायचे असल्यास ह्याला एक phone करायचा... सोनु मुंबईला असतो... आजच एका common friend ला भेटलो तर तो म्हणाला यार सोन्याची बातच और आहे... तो असला की कसे वातावरण live असतं... लहानपणी military school मधील  त्याची साथ... सोबत केलेली भांडणं... तो सोबत नसला असता तर त्या दिवसांची मजा आली नसती.. मागच्या वर्षी मामीला एक promise केल की आमच्यात कधी दुरावा येणार नाही.. 

ह्या दोघांसोबतचे अनेक किस्से आहेत.. लातूर बिलोली हा usual ३ तासांचा प्रवसाला ८ तास लागलेला किस्सा असो वा त्यांच्या सोबतची औरंगाबाद tour, कोकण tour वा तिरुपती ला झालेली राहुलची मुंज.. ती tour.. चुप चुप के movie असो वा the angrez वा Jab we met... हसुन हसुन पोट दुखत असत ह्यान्च्यासोबत.. कितीतरी आठवणी आहेत.. त्यांची सोबत असताना life मधे मजा असते.. 

I want to cherish these moments forever...love being with them...जहाँ पनाह तुस्सी ग्रेट हो! तोहफा कबूल करो!!!

तुमच्या life मधे सुद्धा असे कोणी idiots नक्कीच असतील... त्यांच्यासोबतचे किस्से असतील... 
Please share here and let them know what they mean for you...


हसा खेळा मस्त जगा...

आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 



आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

No comments:

Post a Comment