Wednesday, September 6, 2017

अशी पाखरे येती...


२०१३-१४ ची गोष्ट... "आई, मी ईथेच राहु का शिकायला.. मामाअाजी एकटीच असेल आजपासून ".. निषाद ताईला म्हणाला...५ वर्षाचे पोर ते... पण किती विचार.. सकाळीच दादा पुण्यासाठी निघाला होता..मी सुद्धा संध्याकाळी निघणार होतो... ४-५ दिवस भरुन असणारं घर आज भकास होणार होतं... 


दादा २००४ पासुन पुण्यात आहे..मी इंग्लंड नंतर सिंगापुर ला आलो.. ताई नाशिक मग संगमनेर... आई मात्र बॅंकेमुळे नांदेडला होती.. सणासाठी आम्ही सर्व नांदेडला यायचो.. गेले काही वर्ष असेच चालु होते..

फक्त ४-५ दिवस गोतावळा घरी जमलेला.. नुसती किलकिल.. मामा मावशीची मुले सुद्धा आलेली... खाण्यापिण्याची चंगळच.. आज हे तर उद्या ते... आईला स्वयंपाक करताना सुद्धा रोज एकाची फर्माईश..आईला सुद्धा सगळ्यांची हौस पुरवताना आनंद होतो.. कितीही थकलेली असली कितीही त्रास होत असला तरीही ति नाही कधी म्हणत नाही..

आज मात्र घर रिकामे होणार होतं.. मुलं मोठी झाली असुन सुद्धा आजही घरातून निघताना आईच्या डोळ्यात खळ्ळकन पाणी येत... आणि ते बघुन माझा जीव तुटतो.. तरी राहुल आईसोबत असल्याने थोड बरं वाटतं...


सणासुदीचे दिवस म्हणजे किती मस्त मजेचे ना..शाळांना सुट्टी म्हणून बच्चे कंपनी खुश ... आॅफिस मधे रजा टाकुन मोठे सुद्धा आपापल्या गावी निघालेले... ४-५ दिवस ना अभ्यासाचे tension ना कामाचे... परिवारासह आणि मित्र आप्तेष्टांसह time spend करायला मजाच येते..


सगळे जन एकत्र आले की मस्त गप्पा गोष्टी.. उशिरा पर्यंत जागणे.. छोट्यांचे लाड पुरवणे.. खूप सारे स्पेशल मोमेंट्स साजरे होतात.. खूप काही आठवणी आपल्या मनात घर करतात.. त्या सर्व आठवणी आपण नंतर आठवून आठवून खुश होत असतो..ही पोस्ट लिहीण्याचे कारण म्हणजे सकाळी रेडीओवर गाणे लागले होते..

अशी पाखरे येती,आणि स्मृती ठेवुनी जाती...



तुम्ही सुद्धा सर्व सण परिवारासह आणि मित्र आप्तेष्टांसह साजरे करा.. सदा हसत खेळत आनंदी व एकत्र राहा...
हीच प्रार्थना करुन हा लेख संपवतो...

हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा...


आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...