Thursday, August 27, 2015

Life is Changing...

 बर्‍याच गोष्टी change होत आहेत.. जबाबदारीची जाणीव होऊ लागली आहे.. सर्व मित्रांचे लग्ण झाल्याने घरचे सुद्धा मागे लागलेत की एकाचे दोन व्हा.. So looks like मन stability शोधण्याचा प्रयत्न करतय.. Stable job, property search, investment options etc etc... बरेच विचार चालु आहेत... पण कुठेतरी जग फिरण्याचे स्वप्न दडुन बसलय... कुठेतरी स्वत:ची company start करण्याचा विचार लपुन बसलाय.. Life is changing

बरेच काही शिकायचे राहीलय... खुप खुप नवीन लोकांना भेटायच राहिलय... खुप सार्‍या गोष्टी try करायच्या राहील्यात... बर्‍याच प्रश्नांची उत्तरे शोधायची राहिली आहेत.. पण जबाबदारी आल्यावर हे सर्व असेच राहील का... I know time has the answer for it.. Whatever it may be... Life is changing

तशी life change व्हायला आधीच सुरुवात झालीय... आता त्याची जाणीव होत आहे असे वाटतय.. तसा मी मिथुन राशीचा असल्याने i like changes... Its my personality n attitude to accept changes..
I hope i will respond same here... I hope सर्व ठिक होईल.. 

बाकी एक गोष्ट माहिती आहे...सर्व परिस्थितीतून समोर जात राहायचे व life enjoy करत राहायचे 

आणि आपल्या स्वप्नासाठी जगायचे आहे... 
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवायचे आहे... 
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Saturday, August 1, 2015

३ Idiots

३ ईडियट्स... मस्त movie आहे... मस्त स्टोरी आहे... जीवाला जीव लावणारे मित्र...एक सीन मधे रँचोने जावेद जाफरीला सांगितलेलं असतं .. मै तो किसिको नही मिलूँगा, पर २ ईडियट्स आएँगे मुझे ढूँढने तब क्या करोगे.. प्रत्येकाच्या लाइफ मधे अशे काही मित्र असतात जे आपल्यावर खूप जास्त प्रेम करतात... माझ्या life मधीलसुद्धा अशेच 2 idiots आहेत... राहुल अन सोनु...  एक मावशीचा तर दुसरा मामाचा मुलगा... पण ह्यांची सोबत म्हणजे मित्रासारखी... अगदी लहानपणी पासुन आम्ही सगळ्यागोष्टी सोबतच केल्या आहेत... कदाचीत ह्यांच्यामुळेच मला कधीही मित्रांची उणीव भासली नाही... Bollywood वाले सुद्धा मित्राबद्दल फिल्म बनवताना ३ जणच दाखवतात... दिल चाहता है असो किंवा जिंदगी ना मिलेगी दोबारा... ३ इडियट्स असो वा काई पो छे... तशीच काहीशी chemistry आमची आहे... आम्ही तिघे सोबत आहोत तर गडबड गोंधळ चालुच असतो आणि सभोवताल जर शांत असेल तर मग नक्कीच काहीतरी problem असेल... 

मी आणि सोनु एकाच वयाचे तर राहुल २ वर्ष मोठा... लहानपणापासुन तिघेही सोबत.. खेळ असो वा अभ्यास... सगळी मजा मस्ती सोबतच केली... 

राहुल .. आम्हा तिघात मोठा पण कधीही दादा म्हणालो नाही त्याला किंवा त्यानेही दादागिरी केली नाही... स्वभावाने एकदम दिलफेक माणुस.. मित्राला जीव लावणारा.. माझ्यासाठी तर सर्व सोडुन लक्ष देणारा... एकदा काय झाले मी सहजच call केलेला.. हा hero त्याच्या manager सोबत meeting मधे busy... जसा माझा call आला.. Meeting थांबवली म्हणाला sir important call आहे avoid नाही करु शकत... तुम्ही थांबा..  मग काय माझा कोणताही call असो हा हातातली सगळी कामं बाजुला ठेउन माझ्याकडे लक्ष्य देतो..  मला कावीळ झालेला असताना त्याने माझी घेतलेली काळजी असो वा मी देशाबाहेर असताना आईची काळजी... त्याच्या सोबतचा गणपती dance असो वा drive करताना त्याला दिलेला त्रास असो... कधीही complain केली नाही त्याने... जगात सर्वात जास्त मी कोणाला त्रास दिला असेल तर तो हा... आमचे मित्रमंडळही commanach... माझ्या सर्व चांगल्या मित्रांना राहुल माहिती आहे... Rather only if you are a good friend of mine then i will introduce you to Rahul... 

सोनु.. माझ्या मामाचा मुलगा.. But सख्ख्या भावा पलिकडले नाते.. कधीही काही share करायचे असल्यास ह्याला एक phone करायचा... सोनु मुंबईला असतो... आजच एका common friend ला भेटलो तर तो म्हणाला यार सोन्याची बातच और आहे... तो असला की कसे वातावरण live असतं... लहानपणी military school मधील  त्याची साथ... सोबत केलेली भांडणं... तो सोबत नसला असता तर त्या दिवसांची मजा आली नसती.. मागच्या वर्षी मामीला एक promise केल की आमच्यात कधी दुरावा येणार नाही.. 

ह्या दोघांसोबतचे अनेक किस्से आहेत.. लातूर बिलोली हा usual ३ तासांचा प्रवसाला ८ तास लागलेला किस्सा असो वा त्यांच्या सोबतची औरंगाबाद tour, कोकण tour वा तिरुपती ला झालेली राहुलची मुंज.. ती tour.. चुप चुप के movie असो वा the angrez वा Jab we met... हसुन हसुन पोट दुखत असत ह्यान्च्यासोबत.. कितीतरी आठवणी आहेत.. त्यांची सोबत असताना life मधे मजा असते.. 

I want to cherish these moments forever...love being with them...जहाँ पनाह तुस्सी ग्रेट हो! तोहफा कबूल करो!!!

तुमच्या life मधे सुद्धा असे कोणी idiots नक्कीच असतील... त्यांच्यासोबतचे किस्से असतील... 
Please share here and let them know what they mean for you...


हसा खेळा मस्त जगा...

आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 



आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Thursday, February 12, 2015

...क्योंकी असली मजा तो सबके साथ आता है

लग्नाचा season चालु झालाय.. प्रशांतच्या लग्नासाठी सुट्टी काढली व ७ फेब्रुवारी ला लातुरला पोहोचलो... प्रशांत माझा मावस भाऊ.. लग्न घरी लगबग चालु होती.. मावशी अन मामाची मुले जमली होती.. सगळे आम्ही एकाच वयाचे.. फार तर फार एक-दोन वर्षाचा फरक... लहानपणापासुन, दिवाळीची वा उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की सगळे आजोळी बिलोलीला भेटायचो... Group इतका मोठा आहे की cricket खेळताना players कधीच कमी पडले नाही... 

बिलोलीचे किस्से तर अनेक आहेत... सकाळी सकाळी लवकर उठुन दादा(आजोबा) सोबत शेतात जायचे.. विहीरीमध्ये मस्त पोहायचे... खुप मजा चालायची... बैलगाडीत बसुन जाण्याची ती मजा व त्या प्रवासाची सर आजच्या aeroplane च्या सफरीला सुद्धा नाही... सर्वात जास्त मी काय miss करतो तर रात्री गच्चीवर आकाशातील चांदण्या तारे बघत गाण्याच्या भेंड्या खेळणे... अंधारात घाबरत घाबरत भुतांच्या गोष्टी करणे...
हळुहळु सर्व मोठे झाले.. कोणाची exam तर कोणाला office मधे काम.. So बिलोलीला येण कमी झाले... परवा जेव्हा हैदराबादहुन बिलोलीला घरी गेलो तेंव्हा सगळ्या आठवणी ताज्या झाल्या... मोठी आई लग्न घरी लातुरला असल्याने तिचा पलंग रिकामा दिसला आणि डोळ्यात खळ्ळकन पाणी आले... मोठी आई अन दादांशिवाय बिलोली imagine नाही करु शकत मी... त्या दोघांनी एकत्र बांधुन ठेवलय आम्हाला.. आम्हा बच्चे पार्टीचा खुप जीव आहे त्यांच्यात... दादा जाऊन १० वर्ष झाली but i am yet to accept the fact... I just don't want to accept it.. This is just typical me.. I can't accept losing my people..

इकडे लातुरला लग्नघरी अशीच एक छोटीशी मैफलच जमली होती... मग वराती सोबत लग्नाच्या ठिकणी
जाताना बस मधे केलेला dance लहानपणीच्या सहलीची आठवण देऊन गेला... लहानपणी दादा आम्हा सगळ्यांना घेऊन कोणत्यातरी गावाला घेऊन जायचे.. कधी तुळजापुर पंढरपुर तर कधी निरा नरसिंगपुर गोंदवले आणि कधी मंत्रालय तिरुपती ... सगळ्यांसोबतच्या या सहलीची मजाच काही अौर असायची... 

मागच्या ५ वर्षापासुन बाहेर असल्याने हे सगळे miss करतोय.. Family शिवाय एकटेच वेगवेगळे देश फिरतोय.. तिथे गेलो की वाटते इथे आपली माणसे असायला हवी होती... क्योंकी असली मजा तो सबके साथ आता है...

३१ जानेवारीला नितेशचे लग्न होते हैदराबादला.. नितेशची joint family आहे.. माझे आणि आणखीण एका मित्राचे खुप छान स्वागत केले त्यांनी.. अगदी एका family member सारखे treat केलं.. त्याचे लग्न झाले की next day नितेशकडे एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता जिथे त्याच्या आजोबांनी सर्व छोट्यांना as a token of love एक पाकीट दिले ... त्या मध्ये काही पैसै व एक चिठ्ठी होती... चिठ्ठीवर खुप सुंदर आशिर्वाद लिहीले होते आणि देवाकडे प्रार्थना केली होती की माझे हे कुटुंब सदा असेच हसत खेळत आनंदी व एकत्र राहो...

तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना करुन हा लेख संपवतो...
तुम्ही सुद्धा हसा खेळा मस्त जगा...

आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Sunday, January 4, 2015

Australia calling...

गोष्ट आहे १५-१६ वर्षापुर्वीची... मी सैनिकी शाळेत असतानाची... तिथे आम्ही रोज संध्याकाळी दुरदर्शन वर बातम्या पाहत होतो.. त्या दिवशी तारीख होती ३१ डिसेंबर.. रोज प्रमाणे संध्याकाळची प्रार्थना झाली की तिर्थे संरानी आम्हाला TV समोर बसवले... मी सोनुच्या बाजुला बसलो होतो... सोनु माझ्या मामाचा मुलगा.. आम्ही दोघे शाळेत एकत्र होतो... 

बातम्या चालू झाल्या... वृत्तनिवेदिकेने पहिले काही इकडल्या-तिकडल्या बातम्या सांगितल्या ... राजनीती, मारधाड, वगैरे बातम्यामुळे बोर होऊ लागले... मग new year celebrations च्या बातम्या चालु झाल्या... Australia मधील celebrations TV वर दाखवु लागले... Sydney harbour bridge चा तो दिमाखदार सोहळा वातावरण प्रसन्न करुन गेला... रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या फट्याक्यांनी मन जिंकले होते... मी लगेच सोनुला म्हणालो "सोनु, मला एकदा तरी Sydney ला जायचे आहे.. New year तिथे celebrate करायचे आहे"... सोनुचेही लगेच उत्तर "तू नक्की जाशील अभि, भारी आहेस तु"... मी हसलो आणि म्हणालो "बघु" ... मग काय दरवर्षी 31stला ते celebrations TV वर बघायचो आणि Sydney ला जायचे स्वप्न जागे ठेवायचो... 

बरीच वर्ष गेली.. २०१२ ला London ला new year celebrations enjoy kele...मस्त मजा आली... भयंकर थंडी मधे तिथे celebrate करण्याचा अनुभवच वेगळा होता... नंतर Leeds ला मानव आणि देवांगी भेटले.. देवांगीला सुद्धा Sydney new year बघायचे होते.. मग जेव्हा Singapore ला आलो त्याच वेळेस ठरवले की या वर्षी काहीही होवो Sydney ला ३१ Dec ला जायच़च.. मित्रांना सुद्धा विचारले... ते म्हणाले बघु... गजु आणि नितेश येण्याची possibility होती पण काही कारणास्तव त्यांचे cancel झाले... मी मात्र ठरवलच होता की एकटा का जायचे असेना पण या वर्षी Sydney नक्की.. 

Planning खुप आधीच चालु केली...मग काय tickets, hostels n various activities book केल्या... 30 dec ला खुप excited होतो.. एक स्वप्न पुर्ण होणार होतं... ३१ ला रात्री ०१:३५ ची flight होती... दुपारी १२:३५ ला Sydney ला पोहोचलो.. खुप आनंदी होतो.. संध्याकाळी ५ च्या आसपास  harbour bridge जवळ पोहोचलो. आधीच खुप गर्दी जमली होती... कोणी मित्रासोबत तर कोणी family सोबत आले होते.. मी एकटा जीव सदाशिव... आई दादा ताईला खुप miss करत होतो...

१२ वाजले आणि २०१५ चालु झाले होते... फटाके वाजणे चालु झाले होते... इतके वर्ष TV वर बघत असलेला तो सोहळा आज प्रत्यक्षात अनुभवत होतो... चेहृयावरील आनंद ओसंडुन वाहत होता... खुप खुश होतो... लहानपणी बघितले एक छोटेसे स्वप्न पुर्ण झाले होते...

सोनु ने बोललेला एक वाक्य आठवले
"Faith n Belief makes everything possible, keep faith and believe your dreams..."... 
Thanks sonu. You were correct.. This was for you buddy...

I like dreaming, i am a dreamer and can say one thing, dreams do come true. 
कोशिश तो कोई करके देखे...
सपने सच्चे भी होते है...
दुनिया कोई इतनी बुरी नही...
यहा लोग अच्छे भी होते है...

so keep dreaming and chase your dreams...

हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 


आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...