Showing posts with label London. Show all posts
Showing posts with label London. Show all posts

Friday, August 10, 2012

It's a small world...

Ahsan चा वाढदिवस साजरा केला.. ८ वाजता train होती... Station वर पोहोचलो.. Train platform वर उभीच होती... Seat वर जाऊन बसलो.. गाणे ऐकण्यास ipod काढला... आणि बाजुला बघतो तर काय collin बसलेला .. तो त्याच्या Mrs.सोबत olympic matches बघण्यासाठी आला होता.. वापस leeds ला जात होता... त्याने माझी ओळख करुन दिली आणि सांगितले की we sit couple of seats away at work... ती म्हणाली की world is so small... I mean in this train of around 300-400 seats you should get a seat next to him only...खरचं world is so small..

dictionay.reference.com  नुसार "it's a small world" ची  definition ही खालील प्रमाणे One encounters the same people, events or situations in unexpected places... पण माझ्या साठी ही definition अपुरी पडते...

तुम्ही हम-तुम सिनेमा बघितला आहे का... नसेल तर नक्की बघा... सुंदर कलाकृती आहे... त्या मधेही असेच काहीसे सांगितले आहे.. हम वापस जरुर मिलेंगे क्योंकी ये जिंदगी बहोत लंबी है और ये दुनिया बहोत छोटी... हर किसीकी एक कहानी होती है.. हम जब दुसरे लोगो से मिलते है तब उनकी कहानी हमारी कहानीसे जुड जाती है... उस कहानी का end कैसे करना है ये हमे तय करना है...
जिंदगी बहोत लंबी है वर अजुन एक dialogue आठवला.. Indian film industryच्या first superstar राजेश खन्नांचा... बाबु मोशाय जिंदगी लंबी नही बडी होनी चाहीये... अर्थात या व हम तुम च्या dialogue चे context वेगवेगळे... त्यामुळे त्यांचा अर्थ ही वेगळा...  भाषा किती मजेदार असते ना context बदलला की अर्थ बदलतो... आता तुम्ही म्हणाल की ह्या पुर्ण paragraph चा आणि world is so small चा संबंध काय... तुम्हीच बघा एका मिनीटा पुर्वी आपण london च्या platform वर झालेल्या collin च्या भेटीबद्दल बोलत होतो नंतर हम तुम चा आणि आनंद चा dialogue आणि मग भाषे बद्दल... या चंचल मनामुळे आपण आपल्या जागी बसल्या बसल्या जगातील वेगवेगळ्या गोष्टी फिरुन आलो... आहे की नाही small world चे अजुन एक example ..

बाकी काहीही म्हणा... small world च्या कितीही व्याख्या असल्या तरी आणि जग कितीही छोटे असले तरी महत्वाचे आहे की आपण किती आनंदात जगतो...

आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया...


आपलाच

अभि

Keep Smiling... Be Happy n Always

Monday, July 2, 2012

Hello मी London Underground बोलतेय...

Title वाचुन लहानपन आठवले ना.. मराठीचे शिक्षक निबंध लिहायला सांगायचे... तसाच काहीसा हा प्रयत्न... खुप वर्ष झालेत शेवटचा निबंध लिहुन तेव्हा चुक भुल माफ असावी

मागच्या आठवड्यात London ला गेलो होतो... London आणि Mumbai या दोन्ही शहरात बरीचशी साम्ये आहेत... एक europe ची आर्थिक राजधानी तर दुसरी भारताची... दोन्ही शहरांची लोकसंख्या खुप जास्त... Top 10 most populated cities in the world च्या list मधे दोन्ही शहरांचा नंबर लागतो... जसे Mumbai मधे भारतातल्या प्रत्येक राज्यातील लोक दिसतात तसेच London मधे वेगवेगळ्या देशातील लोक भेटतील... या सारखीच अजुन एक common गोष्ट म्हणजे local trains... London मधे त्यांना underground  म्हणतात... जशी local trains मुंबईची जान आहेत तसेच underground लंडन ची.... London मधे असताना underground ने प्रवासाची ही गोष्ट..

 
Boaggie in a Tube
रविवारी Queen ची jubilee ceremony, सोमवारी british museum enjoy करून झाले.. मंगळवारी परतीचा प्रवास चालु केला... Osterly station ला गेलो... Station वर जास्त गर्दी नव्हती... बहुतेक लोकांनी long weekend* ला घरीच बसुन आराम करावा असे ठरवले असावे.. king's cross ला जाणारी piccadily line underground पकडली आणि एका रिकाम्या बोगीमधे जाउन बसलो...  King's cross station येण्यास अजुन एक तास होता.. कानाला headphones लावले आणि गाणे ऐकत बसलो... गाणे आवडीचे असल्याने आवाज थोडा मोठा होता...

तेवढ्यात एक जोरात आवाज आला "आवाज थोडा कमी करा"...असा मोठा आवाज ऐकल्यावर प्रथम भिती वाटली... मग परत एक आवाज.. "Hello मी London Underground बोलतेय... Please गाण्याचा आवाज हळु करा".. मी पहिल्यांदाच एका train ला बोलताना ऐकत होतो म्हणुन घाबरलेलो..."रोज सर्वांना मोठ्याने गाणे ऐकत असते आज वाटले की स्वतः ही जरा मोठ्याने बोलुन बघावे.. मग कळेल की बाकीच्यांना त्याचा किती त्रास होतो ते"... गाणे बंद केले आणि train च्या बोलण्याकडे लक्ष देउ लागलो...

Piccadily Line
माझे नाव piccadily underground... माझी स्थापना १९०६ मधे झाली.. रोज न थकता प्रवाश्यांना heathrow terminal 5 किंवा Uxbridge ते cockfosters station घेउन जात असते... Piccadily circus, covent garden, Harrods, Buckingham palace, Arsenal FC, King's Cross ह्या सर्व पर्यटन स्थळांना जाण्यास प्रवासी माझा उपयोग करतात...Queen ची crown ceremony पासुन ते diamond jubilee पर्यंत तिच्या सर्व प्रवासाला मी साक्षी आहे..  दोन्ही महायुद्ध असो वा recently २००७ मधे झालेले terrorist attacks असो या विनाशालाही मी अगदी जवळुन पाहिलय... London bridge is falling down कविता ऐकली असेलच... तो पडताना सुद्धा मी बघितलाय... माझे काम २४ तास ७ ही दिवस चालु असते... उनपाउस असो वा london ची हिवाळ्यातली गारेगार थंडी असो... मी नेहमी प्रवासी सेवेस तत्पर असते... 

London Tube Map
अहोरात्र सेवा करुनही मला तुम्ही माणसे नावे ठेवत असता..  मी वेळेवर काम करत नाही.. बोगी स्वच्छ नसते.. ह्या ना त्या कारणाने blame करण्याची सवयच लागली आहे तुम्हा लोकांना... एकदा काय झाले की neat maintainance न केल्याने मी स्टेशनवरच बंद पडले.. प्रवाशांना कामावर जाण्यास उशीर होउ लागला त्यातील काही जण मग मलाच रागावु लागले.. त्या आधीच्या आठवड्यात drivers नी strike केली होती.. तेंव्हा सुद्धा लोकांचा राग माझ्यावरच.. मला चालवणारी तुम्ही माणसेच... Seats ना chewing gum चिटकवुन खराब करणारी तुम्ही माणसेच... Chips packets व alcohol bottles चा कचरा करणारे सुद्धा तुम्हीच... तरीही तुम्ही मला का नावे ठेवता?

पण या सगळ्यात काही चांगली माणसे सुद्धा भेटतात.. कधी कोणाची एखादी हरवलेली वस्तु सापडली असेल तर ती lost n found center वर आणुन देतात.. वडीलधारी आणि म्हातारी व्यक्ती उभे असेल तर त्यांना बसण्यास जागा देतात.. काही कलाकार मंडळी, मग तो लेखक असो वा गायक कवी असो वा mimicry artist, कलाकृती माझ्या सोबतच पहिल्यांदा share करतो... काही जणांना त्यांची कला प्रेक्षकांसमोर सादर करण्यास train म्हणजे एक चांगला platform भेटतो तेव्हा मनाला एक वेगळेच समाधान वाटते ... काहीजण त्यांची सुख दुःख माझ्या जवळ सांगतात तेव्हा मी शांतपणे सोबत असते... त्यांच्या जीवनातले चढ उतार ऐकुन कधीकधी वाटते आपणही सजीव असतो तर...

काल परवाचाच एक incident... एका माणसाने माझ्यासमोर येउन आत्महत्या केली.. सगळी वाहतुक ठप्प झाली होती.. बाकीच्या प्रवाशांना त्याचा त्रास झाला.. खुप वाइट वाटले... विचार केला की time machine असती तर भुतकाळात वापस जाऊन त्याला वापस आणले असते व चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन त्याला दाखवले असते की जीवन किती सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया..

King's Cross Station
Train हे सगळे खुप आत्मीयतेने सांगत होती व मी पण त्यात मग्न झालो होतो... तेवढ्यात एक announcement झाली "the next station is King's Cross...blah blah blah..."... तेव्हा train ला पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने गाणे न ऐकण्याचे आश्वासन देउन मी station वर उतरलो...

पण मनात अजुनही train चे बोलणे घुमत होते...
जीवन सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया


आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...


*jubilee event मुळे सोमवारी व मंगळवारी सुद्धा सुट्टी होती