Sunday, July 15, 2012

ज्या झाडाला फळे लागतात तेच वाकलेले असते...

30 june ला wimbledon ची match बघण्यास गेलो होतो.. Practice ground वर बरेच जण practice करत होते.. त्या पैकी एक होता Novan Djokovic... World number 1player... Practice संपली व तो वापस जाण्यास निघाला... त्याचा autograph घेण्यास चाहत्यांनी बरीच गर्दी केली होती.. लोक खुप वेळा पासुन त्याची वाट बघत होते.. त्या गर्दीत मी सुद्धा होतो.. लोकांनी त्याला आवाज दिला व तो सर्वांना भेटण्यास आला... मी माझा tennis ball पुढे केला व म्हणालो thank you for the autograph n all the best for the title.. तो म्हणाला की it's my pleasure, u came here... एका सामान्या चाहत्याला त्याचे हे उत्तर... त्या उत्तरावरुन मी भारावुन गेलो.. Tennis विश्वात इतकी उंच भरारी मारुनही त्याचे पाय जमिनीवर आहेत अजुन... खुप आनंद झाला... मराठीत एक वाकप्रचार आहे की ज्या झाडाला फळे लागतात ते वाकलेलेच असते... त्याचा प्रत्यय आला आज...

अशीच एक गोष्ट Roger Federer बद्दल ऐकली आहे... Tennis पटुंचे कसे असते त्यांना जेव्हा practice करायची असते त्या आधी practice ground book करावे लागते.. Federer ground book करण्यास गेला... त्याने groundsman ला सांगितले की मला ह्या ह्या वेळेस practice करायची आहे.. Ground available असल्याने groundsman ने ते book kele... Federer वापस निघाला... जाता जाता काही अंतर पार करुन गेल्यावर त्याला आठवले की त्याने groundsman ला नावच सांगितले नाही... Federer मागे वळला groundsman जवळ गेला व म्हणाला sorry i forgot to tell my name, my name is roger federer... Groundsman म्हणाला की who doesn't know you... I have booked it already... Federer thanks म्हणुन वापस गेला... एवढे मोठे नाव असुनही त्याला हा माज नाही की माझे नाव तर सगळ्यांनाच माहिती असेल... मोठ्या लोकांचे मोठेपण लगेच ओळखु येते... उगीच लोक नाही म्हणत की he is the greatest..

मागच्या आठवड्यात manager ने party दिली हो़ती... जेवता जेवता ़तो त्याच्या पुर्वीच्या collegues बद्दल बोलत होता..  त्याचा एक collegue खुप चांगला माणुस, senior n experienced असुनही तो कधीही कोणालाही मदत करण्यास तयार.. काही जणांना जसे थोडेसे जास्त knowledge असले की बाकीच्यांना ते भावही देत नाहीत, अश्यापैकी नव्हता तो... मी म्हणालो आपल्या team मधे Russell आहे ना तो सुद्धा तसाच आहे... नेहमी knowledge share करत असतो... Team archtect आहे तो team चा.. १६-१७ वर्षाचा experience असुनही नेहमी नवनवीन गोष्टी  शिकत असतो.. मी team मधे सगळ्यात नवीन..as a fresher मी team join केली.. पण त्या माणसाने मला कधीच त्याची जाणीव होऊ दिली  नाही... एखादी गोष्ट अडली की मी त्याला विचारतो आणि तो पण कितीही काम असले तरी लगेच help करतो.. IT field मधे एखाद्या गोष्टीचे solution काढताना किती वेगवेगळ्या गोष्टीचा कसा विचार करावा हे मी त्याचा कडुन शिकत आहे... खरच ज्या झाडाला फळे लागतात ते वाकलेलेच असते... 

ह्या लोकांकडुन खुप काही शिकायला मिळते... 
वाटते आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया

आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

No comments:

Post a Comment