Thursday, June 30, 2016

आई रिटायर होत आहे ;(

 1995-96 ची गोष्ट असावी.. स्वयंपाक घरात रेडिओवर सकाळी छान गाणे लागले होते.. रोजच्या सारखी मला जाग आली आणि मी आईला जाऊन घट्ट मिठी मारली.. आई पुजा करुन स्वयंपाक करायला लागली होती.. 

आईचा हा रोजचा दिनक्रम.. पहाटे पाच वाजता उठणे.. अंगण झाडून सडा टाकून व बाकी सर्व कामे आटोपून सात वाजेपर्यंत स्वयंपाकाला लागणे...  मग मी दादा ताई तयार झालो की साडे नऊ वाजता जेवण करून बँकेत जाण्यासाठी निघणे.. सायंकाळी सहा वाजता वापस घरी.  मग चहा घेऊन परत स्वयंपाक..  बाबा गेल्यावर मागची 25 वर्षे तिचा हाच नित्यक्रम.. 

आज 25 वर्ष सेवेनंतर आई रिटायर होत आहे.. आम्ही लहानाचे मोठे झालो..  आप आपल्या कामाला लागलो.. मग जाण होऊ लागली की आईने तोच दिनक्रम इतके वर्ष कसा पाळला असेल.. आपल्याला तर आठवडा कधी संपणार आणि कधी शनिवार रविवार येणार ह्याचीच घाई असते.. तिला तर तोही नव्हता.. आजारी पडायची परवानगी नव्हती  ना कधी सुट्टी घ्यायची... आई म्हणजे खरच एक जादू आहे.. घर बँक तीन लहान मुले.. आईने सर्व काही मस्त सांभाळल.. 

आज जो काही आहे तो आई मुळेच.. कधी रागावली नाही किंवा कधी हात उगारला नाही.. फक्त लाडच केले.. आधी शाळा आणि आता नोकरीच्या निमित्ताने आई पासुन दुर राहतो आहे.. त्यामुळे आई विषयी काही आल की मी खूप emotional होतो.. आई साठी काही लिहायला लागलो की खूप आठवण येते आणि  का कोण जाणे हात थरथरायला लागतो आणि डोळ्यातून पाणी यायला चालु होते.. आता ही तसेच होते आहे.. 

आई खरंच काय असते?

लेकराची माय असते

वासराची गाय असते

दुधाची साय असते

लंगड्याचा पाय असते

धरणीची ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!



- कविवर्य श्री. फ. मु. शिंदे.


हे वाचून जर तूम्हाला आईची आठवण झाली असेल तर लगेच त्या माऊलीला call करा आणि I love you जरूर म्हणा...

हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 


आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...