Sunday, January 4, 2015

Australia calling...

गोष्ट आहे १५-१६ वर्षापुर्वीची... मी सैनिकी शाळेत असतानाची... तिथे आम्ही रोज संध्याकाळी दुरदर्शन वर बातम्या पाहत होतो.. त्या दिवशी तारीख होती ३१ डिसेंबर.. रोज प्रमाणे संध्याकाळची प्रार्थना झाली की तिर्थे संरानी आम्हाला TV समोर बसवले... मी सोनुच्या बाजुला बसलो होतो... सोनु माझ्या मामाचा मुलगा.. आम्ही दोघे शाळेत एकत्र होतो... 

बातम्या चालू झाल्या... वृत्तनिवेदिकेने पहिले काही इकडल्या-तिकडल्या बातम्या सांगितल्या ... राजनीती, मारधाड, वगैरे बातम्यामुळे बोर होऊ लागले... मग new year celebrations च्या बातम्या चालु झाल्या... Australia मधील celebrations TV वर दाखवु लागले... Sydney harbour bridge चा तो दिमाखदार सोहळा वातावरण प्रसन्न करुन गेला... रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या फट्याक्यांनी मन जिंकले होते... मी लगेच सोनुला म्हणालो "सोनु, मला एकदा तरी Sydney ला जायचे आहे.. New year तिथे celebrate करायचे आहे"... सोनुचेही लगेच उत्तर "तू नक्की जाशील अभि, भारी आहेस तु"... मी हसलो आणि म्हणालो "बघु" ... मग काय दरवर्षी 31stला ते celebrations TV वर बघायचो आणि Sydney ला जायचे स्वप्न जागे ठेवायचो... 

बरीच वर्ष गेली.. २०१२ ला London ला new year celebrations enjoy kele...मस्त मजा आली... भयंकर थंडी मधे तिथे celebrate करण्याचा अनुभवच वेगळा होता... नंतर Leeds ला मानव आणि देवांगी भेटले.. देवांगीला सुद्धा Sydney new year बघायचे होते.. मग जेव्हा Singapore ला आलो त्याच वेळेस ठरवले की या वर्षी काहीही होवो Sydney ला ३१ Dec ला जायच़च.. मित्रांना सुद्धा विचारले... ते म्हणाले बघु... गजु आणि नितेश येण्याची possibility होती पण काही कारणास्तव त्यांचे cancel झाले... मी मात्र ठरवलच होता की एकटा का जायचे असेना पण या वर्षी Sydney नक्की.. 

Planning खुप आधीच चालु केली...मग काय tickets, hostels n various activities book केल्या... 30 dec ला खुप excited होतो.. एक स्वप्न पुर्ण होणार होतं... ३१ ला रात्री ०१:३५ ची flight होती... दुपारी १२:३५ ला Sydney ला पोहोचलो.. खुप आनंदी होतो.. संध्याकाळी ५ च्या आसपास  harbour bridge जवळ पोहोचलो. आधीच खुप गर्दी जमली होती... कोणी मित्रासोबत तर कोणी family सोबत आले होते.. मी एकटा जीव सदाशिव... आई दादा ताईला खुप miss करत होतो...

१२ वाजले आणि २०१५ चालु झाले होते... फटाके वाजणे चालु झाले होते... इतके वर्ष TV वर बघत असलेला तो सोहळा आज प्रत्यक्षात अनुभवत होतो... चेहृयावरील आनंद ओसंडुन वाहत होता... खुप खुश होतो... लहानपणी बघितले एक छोटेसे स्वप्न पुर्ण झाले होते...

सोनु ने बोललेला एक वाक्य आठवले
"Faith n Belief makes everything possible, keep faith and believe your dreams..."... 
Thanks sonu. You were correct.. This was for you buddy...

I like dreaming, i am a dreamer and can say one thing, dreams do come true. 
कोशिश तो कोई करके देखे...
सपने सच्चे भी होते है...
दुनिया कोई इतनी बुरी नही...
यहा लोग अच्छे भी होते है...

so keep dreaming and chase your dreams...

हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 


आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...