Sunday, November 10, 2013

असेच काहीतरी..

Project change झाला व  काम वाढले असल्या कारणाने मागील काही दिवसा पर्यंत Online blogs वाचणे बंद होते.. आता थोडासा settle झालोय.. So ते परत सुरु झालेय... आज काल काही biography किंवा अनुभव अश्या प्रकारांच्या blogs and movies वाचण्यात अथवा पाहण्यात आल्या... मुग्धा ताईचा blog n तिचे मुग्धाची रंगीत गोष्ट हे पुस्तक, tom hanks ची forest gump n captain philips movies, अशोक व्हटकरांच्या 72 मैल एक प्रवास या कलाकृती वरील चित्रपट हे त्यातीलच काही... 

मग विचार आला आपणही असे काहीतरी लिहावं... थोडासा plan केला.. मग ठरवले की triology बनवावी.. म्हणजे लहानपण,  मग तरुणपण आणि म्हातारपण... मग तीन नावे सुद्धा ठरवली... अभ्योदय, अभिरिक्षा आणि अभ्यास्त... ह्या पैकी पहिली २ तर मी पुर्ण करेन पण अभ्यास्ताचा शेवट मात्र अधुरा राहील व कोणालातरी पुर्ण करावा लागेल... At the moment तरी हे सर्व possible वाटतय पण बघु पुढे काय होईल ते... आखिर कल किसने देखा है़||

इग्लंड मधे आल्यापासुन स्वताःसाठी चांगला वेळ भेटतोय... Train मधुन travel करताना वा रात्री बिछान्यात असताना लिहीण्यासाठी काहीनाकाही सुचतच असते.. विचारांची speed इतकी fast असते व बरेचश्या गोष्टी लिहीपर्यंत विसरुन जातो.. आणि मग वाटते की असे काहीतरी साधन असायला हवे जे आपण विचार करता करता ते कागदावर उतरवुन घेइल... I hope अभ्यास्त पुर्ण होईपर्यंत असा काहीतरी शोध लागेल.... 

बाकी, आजकाल काही तरी change होतय... काय ते माहीती नाही... थोडासा शांत झालोय... डोक्यात विचारांचा कल्लोळ माजलाय... बरेचशी अपुर्ण कामे पुर्ण करतोय.... कदाचीत भारतात परत जाण्याचे वेध लागलेत.. Hopes काहीतरी चांगलेच होईल...

पुढे काय होईल ते देव जाणो एक गोष्ट मात्र नक्की आहे
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवायचे आहे... 


आपलाच

अभि

Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Tuesday, October 22, 2013

It Hurts...

श्याम सोबत सहजच chatting चालू होती... विचारले कसा आहेस रे... तो म्हणाला छान आहे पण इतका ही छान नाहीये.. मी म्हणालो का रे काय झाले.. तो सांगत होता.. काय बोलू यार, ऑफीस हून घरी येण्यास 2 तास लागतात.. पकुन जातो... मी म्हणालो.. सही है.. Enjoy.. तुला ऑफीस हून घरी जाण्यास 120 मिनिटा पेक्षा जास्त वेळ लागतो..आणि मला 12 मिनिटा पेक्षा कमी... तीकडून त्याचा reply तू जले पे नमक छिडक...मी म्हणालो.. साला तुम उधर बैठके ऐश करते..सब अपने दोस्तो के साथ enjoy करते...मैने थोड़ा जले पे नमक क्या छिड़का तुम्हे कड़वा लग गया... इधर साला.. पूरा जल जल के काला हो गया है.. नो सेन्सेशन.. It hurts re when you are not with your friends and family in their happy n sad moments...
इथे UK मधे आल्या पासुन बर्याचश्या चांगल्या गोष्टी घडत आहेत... जसे की prince William आणि Kate ची Royal Wedding, queens jubilee celebrations, olympics... Wimbledon, champions trophy etc etc... बहुतेक जण म्हणायचे... ऐश आहे तुझी, सर्व enjoy करण्यास भेटतंय... मी म्हणालो अमित दादाचे, पल्लवी ताईचे व श्यामचे लग्न miss केले.. त्या पुढे ही मजा माझ्यासाठी important नाहीये.. It hurts...

आजचा विषय थोडा वेगळा आहे... I mean याला सलग अशी storyline नाहीये तर तो काही collection of incidents शी संबंधीत आहे.. पण theme मात्र तीच आहे It Hurts...

अजुन एक प्रसंग... जुन मध्ये भारत-पाकीस्तान cricket match बघण्यास गेलो होतो... दोन्ही देशांचे बरेचशे supporters आले होते...birmingham train station मधुन बाहेर येताना एक group वाटेत गप्पा मारत होता.. ते लोक match बघण्यास आले होते, एका मित्राची वाट पहात होते... त्यातील एका british born desi मुलीकडे तिरंगा होता... तिने तो उल्टा पकडला होता... मी लगेच तिला सांगितले की झेंडा नीट पकड... माझ्या सोबत मानव होता.. तो म्हणाला असे कितीतरी जण भेटतील आणि तु कितींना सांगशील.. मी म्हणालो जेवढे दिसतील त्या सर्वांना सांगेल.. माझ्या झेंड्याचा अपमान मला नाही चालणार... It hurts...

प्रत्येकाला आपले जीवन जगत असताना काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागते... त्याची किंमत काय ते मात्र आपल्या हातात नसते.. माझ्यासाठी माझे मित्र माझी family त्यांच्या सोबतचा time, ते moments हे खुप महत्वाचे आहेत... So त्या पैकी काही miss झाले की hurt होतं... 

बाकी कितीही hurt होत असले तरी जगायच असतचं
व जगता जगता आयुष्य सुंदर बनवायचे असते....

So, हसा खेळा मस्त जगा...

आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Thursday, August 15, 2013

Once Again...

Once Again Its the celebration of Independence Day
Once Again The TriColor is hoisted at LalQila
Once Again We sang patriotic songs
Once Again We praised our forefathers for fighting against injustice

but
Once Again
Everything is same for a common man
A holiday to enjoy with family n friends
Abusing the government n politicians for not doing anything
Its the same thing happens everytime
And Its the same life

Once Again Its the celebration of Independence Day
Once Again We listened to speeches of great leaders
Once Again We watched patriotic movies
Once Again We enjoyed the feel of being independent

but
Once Again
Its the same day for me
Its the same story in the office
Its the same me
And Its the same life

Once Again...

Tuesday, May 14, 2013

मे महिना, सुट्टया आणि बालपण...


"या वर्षी उन खूप आहे" कालच आई म्हणत होती... मी म्हणालो "मे महिना चालु झालाय आता तर झळा आणखीण वाढतील"... दरवर्षी असेच होते, मे महिना आला की गर्मी वाढते आणि उन्हाळ्याबद्दल चर्चा चालु होतात... पण मे महिना हा आणखीण दोन गोष्टींशी निगडीत आहे.. सुट्टया आणि बालपण...

माझे माध्यमिक इयत्तेतील शिक्षण सगरोळीला सैनिक शाळेत झाले... मी आणि सोनु(मामाचा मुलगा), दोघे तिथेच होतो... आमची शाळा निवासी होती... १मे ला निकाल लागायचा आणि सुट्ट्या चालू... मग महिनाभर ना PT ना अभ्यास.. ना कोणी रागावणारे ना कोणी शिक्षा करणारे... मज्जाच मजा...त्या काळी दादांकडे ( आम्ही आजोबांना दादा म्हणत असु) एक जीप होती, Commander... आई, मामी आणि मामा व सोबत घरचे चिल्ले पिल्ले...सगळे आम्हाला घेऊन जायला शाळेत यायचे व आम्ही लगेच घरी निघायचो...... आम्ही नेहमी complaint करायचो की शाळेतुन घरी जाताना घर लवकर नाही येत पण तेच सुट्टया संपल्यावर शाळेत येताना, शाळा खुप लवकर यायची... 

सुट्टयामध्ये मी बहुतेक वेळ बिलोलीला असायचो... बिलोली, माझे आजोळ, तालुक्याचे ठिकाण.. आजी आजोबा मामा मामी तिथे असायचे... सुट्टयामध्ये आम्ही सगळी भावंड तिथेच जमा़यचो... मला ४ मामा व ३ मावश्या... त्यामुळे group ही तसा मोठाच.. १०-१२ जणांचा..

सकाळी लवकर ६ वाजता उठुन दादांसोबत मळ्यात जायचो..  ़संपुर्ण शेतावरुन एक चक्कर मारायची... पेरु, कैरी, चिंचा, बोरं, इंग्लिश आवळे वगैरे वगैरे खाउन झाले की मोर्चा विहीरीकडे वळायचा...शेतातील विहीर चांगलीच खोल होती, दादा एका गडी माणसाला आमच्यावर लक्ष ठेवायला सांगायचे आणि पुन्हा एक चक्कर मारण्यास निघुन जायचे... आम्ही सगळे पोहणं इथेच शिकलो...मनसोक्त पोहुन झाले की स्वारी वापस घरी निघायची ... जाताना मस्त इडली वड्या वर ताव मारायचा... घरी गेल्यावर सुद्धा साल पापडं, बोराच्या वड्या आणि महत्वाचे म्हणजे आंबे, या सगळ्यावर डोळा असायचाच... मग दिवसभर घरातच cricket खेळायचो... दादा नेहमी रागवा़यचे.. तेव्हा थोडावेळ शांत बसा़यचो... दादा बाहेर गेले की पुन्हा चालु...दिवस कसा निघून जायचा या कडे लक्ष्यच नसायचे...रात्रीचे जेवण झाले की सगळे जन गच्चीवर जायचो, तिथे मग पत्ते, अंताक्षरी, गप्पा रंगायच्या... थंड वातावरणात मोकळ्या आकाशा खाली मग झोप कधी लागायची हे कळायचेच नाही

नृसिंह जयंती ही उन्हाळ्यात असते.. त्या दिवशी आमच्याकडे मोठी पुजा असते... त्या दिवशीचा स्वयंपाक म्हणजे माझा सगळ्यात आवडता...मसालेदार वांग्याची भाजी, भरडा भाजी, पुरी, साधं वरण, भात आणि पन्हं, आंब्याचा रस... वाह, आता लिहीतानाही तोंडाला पाणी सुटतय...

आजकाल मात्र विचित्रच झालंय.. सुट्टया म्हणजे फक्त weekend होउन बसल्यात.. पैसे कमवायाच्या नादात कुठे तरी ते बालपण miss करतोय...मोकळ्या आकाशाखाली, गच्चीवर झोपून तर किती दिवस झाले ते ही आठवत नाही... अंताक्षरी आणि पत्ते तर दूरच पण सगळ्याना एकत्र मिळून बोलण्यास google hangout use करावे लागते...
खरच लहानपनीच्या आठवणी किती सुंदर असतात ना...

पण कोणीतरी म्हणालय़..Embrace you past but live in present..
So, हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Thursday, March 14, 2013

Life is beautiful*


A cool breeze evening
On a nice sand beach


You are with your loved one
Life is beautiful....


A gang of friends
Enjoying the cutting n hot bhajiyas
In a nice rainy weather
Life is beautiful..

Quality time to spend with your family
Reliving all your cherished memories
A great plan for holidays
Life is beautiful...

An important sports match on Tv
Interesting n crucial moments
Your team wins it n gets through
Life is beautiful...

Life's going great
Everything's going your way
All the nice things are happening with you
Life is beautiful...

Life is always beautiful
Its just the matter of that asterisk(*)
Life is beautiful*
*Conditions applied

पण मी सगळे त्या asterisk(*) वर सोडत नाही... जिंदगी ना मिलेगी दोबारा मधे एक सुंदर dialogue आहे..

नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
हवा के झोकोन के जैसे आज़ाद रहना सीखो
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल एक नया समा देखे यह निगाहें
जो अपनी आँखों में हैरानिया लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
तेव्हा आलेल्या सर्व परिस्थितीतून समोर जात राहायचे व life enjoy करत राहायचे
आणि आपल्या स्वप्नासाठी जगायचे

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
म्हणून कोणी कितीही (*) दाखवले तरीही एक गोष्ट लक्ष्यात आहे... 
आयुष्य सुंदर आहे  त्याला अजुन सुंदर बनवायचे आहे... 
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Friday, March 1, 2013

अरे वोही लड़की...वोही लड़की....


Weekend संपून सोमवार आला.. सकाळी ७.१५ चा गजर झाला... मी उठलो... ऑफीस ला जाण्यास तयार होऊ लागलो... स्नान वगैरे केल मग दुपारचा डब्बा पॅक केला... बातम्या लावल्या... ८.४५ होतात... निघतो ऑफीस कडे... जाताना खूप सारे जन भेटतात... भेटतात म्हणजे काय फक्त बाजूने निघून जातात... त्यांची सुद्धा कॉलेज, ऑफीस किंवा बस स्टॉप कडे जाण्याची धावपळ चालूच असते... around ८.५५ ला ऑफीस मधे पोहोचतो... मग ५.३० पर्यंत तेच ऑफीस ऑफीस खेळतो.. वापस घराकडे जाण्याची तयारी... जाताना सुद्धा बरेच जन भेटतात... या वेळेस त्यांची लगबग असते ती लवकर ट्रेन किवा बस पकडण्याची... मी घरी पोहोचतो... परत तेच आपले so called Social Networking...मग स्वयंपाकाची तयारी.. जेवण करताना एखादी सीरियल चालू करतो Laptop वर.. ती संपे पर्यंत जेवण सुद्धा होत... मग शांत गाणे ऐकायचे आणि शतपावली करायची... १०.३० वाजतात आणि बेडरूम चा लाइट बंद होतो... दिवस संपतो..
असाच मंगळवार येतो मग बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार... आणि आठवडा जातो... ही दैनंदिनी चालूच असते... म्हणजे तेच... सकाळी ७.१५ ला उठने... तयार होऊन ऑफीसला जाणे... जाताना बर्‍याचश्या अनोळखी पण ओळखी लोकाना भेटणे.. परत तेच ऑफीस काम संपले की back to home... परत त्याच अनोळखी लोकाना भेटणे... आणि तेच routine...असे एक चाकोरीबद्ध जीवन... ज्याची मला सर्वात जास्त चीड आहे ही एक सप्रेम भेट दिलीय मला लीड्स ने...चाकोरीचे खरडुन कागद सहिस पाठवणे ह्या बाहेर काही नाही...
ह्या framed routine मधे एक गोष्ट मस्त होते... जाता - येता जे लोक भेटतात त्यांच्या सवयी कडे लक्ष्य देण्याची सवय मला लागली... लिफ्ट मधून खाली येताना दोन मुली त्याच वेळेस सोबत असतात... जो पर्यंत बस स्टॉप जवळ पोहोचतो तेव्हा तिथे एक छोटी मुलगी आणि तिची आई थांबलेले असतात...ती मुलगी नेहमी काहीतरी बडबडत असते... खेळत असते... तिला क्रॉस केला की एक मुलगा माझ्या opposite direction ला जात असतो... तो football player Nani चा छोटा भाऊच दिसतो....तो सुद्धा त्याच्या तन्द्रित.. काही तरी ऐकत आणि गात असतो... आता तो फोन वर बोलतो का गाणे गुणगुणतो हे अजुन समजले नाही...
इथे येई पर्यंत त्या लिफ्ट मध्ये सोबत असलेल्या मुलीनी साथ सोडलेली असते... मग मी आणि मयूर... थोडेसे समोर गेले की एकानंतर एक अश्या परत दोन मुली भेटतात... मग मी आणि मयूर एकमेकाना त्यांच्या वरुन चिडवतो... तेरीवाली अन् मेरीवाली... पण ह्या दोघींपैकी संध्याकाळी जाताना कोणी भेटत नाही... मग त्या वेळेस जर कोणी दिसले तर आमचे चालू होते... वोही लडकी वोही लडकी....
या सगळ्यातून थोडासा आराम भेटतो तो weekend ला.... काहीतरी activities चालू असतात... क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन किवा कुठे तरी फिरून येणे... एक बरे आहे की या वर्षी काही चांगले मित्र भेटले.. नाहीतर जगात सर्वात चू****** लोक मला इथे लीड्सला भेटले... एक एक प्राणी नमूना... त्यांच्या वर लेख लिहीत बसलो तर कदाचित एक पुस्तक तयार होईल... असो...
बरेच दिवस झाले ती मेरीवाली दिसली नाही... म्हणून पोस्ट लिहावीशी वाटली...
बाकी तर.. Life is Beautiful...

हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...

आपलाच

अभि

Keep Smiling... Be Happy n Always


Wednesday, January 2, 2013

Happy New Year...


नवीन वर्ष नवीन सुरुवात...  ३६५ पानांची नवीन वही परत एकदा उघडुन श्रीगणेशा करायचा... नवीन रस्ते नवीन वाटा काबीज करत नवनवीन ध्येये गाठायची... दर वर्षीच हे होत.... १ जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत करुन या वर्षी काहीतरी वेगळे करायचे हे ठरवतो व काही so called resolutions सुद्धा करतो...
 
वर्षे जातात अन् येतात... काळ काही थांबत नाही... शेवटचा दिवस आला की मग वर्ष भराचा हिशोब लावायला सुरुवात होते... जुनी आणि जीवाभावाची नाती तुटतात.. त्याची उणीव पुर्ण करण्यास नवीन नाती आयुष्यात येतात..जुने ते सोनंच असते असे बरेच वेळेस वाटते... . नवीन नात्यात आपण जुना गोडवा शोधण्यास जातो आणि काही वेळेस मृगजळच हाती लागते... पण म्हणुन काही आयुष्य थांबत नाही... आणि वेळही नाही... ते तसेच चालु रहाते, किंवा राहु द्यावे लागते... नवीन गोष्टीच्या स्वागतासाठी व नवीन सुखाच्या शोधासाठी...

तसे माझ्याबाबतीतही झाले... २०१२ ने मलाही असे बरेच काही दिले...मागच्या वर्षभरात खुप काही घडले... खुप नवीन ठिकाणे फिरलो...बरेच नवीन मित्र मिळाले तर काही जुने दुर गेले... नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या आणि काही राहूनच गेल्या... 

Leeds मधे settle झालो rather थोडा रुळलो... वर्षाची सुरुवात एकदम छान london fireworks ने झाली..was one of the best days of life... मग जुनैद व अहसान, मलेशिया व लंडनला shift झाले... Leeds मध्ये मानव व मयुर सारखे मित्र भेटले...cornwall ची मस्त trip झाली, वर्ष सरता सरता liverpool सुद्धा पाहुन झाले... Wimbledon व olympic ची मजा सुद्धा लुटली... खुप सारी स्वप्ने पुर्ण झाली... पण काही इच्छा अधुर्‍याच राहील्या... Guitar n harmonica शिकण्याचे अर्धवटच राहिले...अजुन edinburgh n highlands explore करायचेच आहे... Charity work सुद्धा चालु करायचे आहे... 
 
नवीन वर्षात ह्याच अधुर्‍या गोष्टी पुर्ण करायच्या आहेत.. नवीन मित्र मिळवायचे आहेत.. नवनवीन ठिकाणे explore करायची आहेत.. एखादे तरी वाद्य शिकायचे आहे... 
 
तुमचेही असेच काहीतरी ठरले असेल नं..  तेव्हा त्यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना समाधानाचे, सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना...
 
हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...

आपलाच
अभि 
Keep Smiling... Be Happy n Always