Saturday, June 2, 2012

वाढदिवस...



नवीन ब्लॉग वरील प्रथम पोस्ट़़.... विचार केला की काय लिहावे, खुप काही चालु आहे या जगात... भारतात पेट्रोलचे वाढलेले भाव, महागाई भ्रष्टाचार आणि उन्हाने त्रासलेली जनता़... Recession मधे गेलेला Europe.. आणि US मधे Obamaची next term साठी चालु असलेली तयारी....

मग वाटले स्वतः पासुन सुरूवात करावी...परवाच २९ मे ला वाढदिवस होता माझा.... Finally आम्ही silver jubilee complete केली...आता हे ह्या साठी लिहीत नाहीये की मी २५ वर्षाचा झालो व तुम्ही मला विश करावे... सर्वांच्या जीवनात ही पायरी आली असेल अथवा येईल... तर ही पुढच्या भागा साठी छोटीशी ओळख..

आत्ता पर्यंत माझे सर्व वाढदिवस वेगळ्या तर्हने साजरे झालेत... तसा या वेळेस ही वेगळ्या पद्धतीनेच झाला.. फरक एवढाच की दरवेळेस मित्र परिवार सोबत असायचा.. या वर्षी मात्र एकट्यानेच... मग स्वत: च केक आणा... नवीन ड्रेस घालुन साजरा करा... मग स्वत: च स्वतः ला शुभेच्छा द्या... अगदी gift पण आणा...
खरच किती वेगळे असते ना घरापासुन आणि मित्रांपासुन दुर राहणे.... म्हणजे आपण फक्त स्वतःसाठीच आणि एकटे जीवन जगत असतो.. इंग्रजी मधे सांगायचे तर lonely... मग technology ने कितीही प्रगती केली असली, आपण skype facebook or gmail वरून सर्वांच्या कितीही touch मधे असलो तरी physical presence किती महत्वाचा असतो ना...

मला आजही माझा ४थीतला वाढदिवस आठवतो... उन्हाळ्याच्या सुट्यात आम्ही सर्व आजोळी होतो... मामा मावशी त्यांची मुले सर्व जन आले होते.. माझे आजोळ एक छोटेशे गाव... खेडे वगैरे नाही म्हणनार पण तरीही केक मिळायचा नाही तिथे... मग मामा सोबत आम्ही सगळे छोटी मुले मोठ्या शहरात जायचो... तिथे नविन ड्रेस, केक, gifts आणि आम्ही सर्वांनी केलेला धिंगाना ... आता त्या वेळेस gift म्हणजे एखादा Parle-G चा biscuit पुडा वगैरे.. पण तो हि खुप आनंद द्यायचा... मग संध्याकाळी आई आजीने केलेलं औक्षण़़ व सर्व मोठ्यांनी दिलेले आशीर्वाद आणि खाऊ... दिवस कसा मस्त मजेत गेला ते कळालेच नाही.. खुप मज्जा केली होती....
 
Birthday Celebrations were always special to me...may be प्रत्येकासाठीच असेल...

अगदी recent म्हणाल तर मला माझे व मित्रांचे वाढदिवस आठवतात.. 26 नोव्हेंबर २००६ ला सुहासचा exam time मधे साजरा केलेला वाढदिवस आणि तेव्हा चिन्मय च्या घरी घातलेला गोंधळ... २० जुलै २००७ ला पियूचा वाढदिवस, एक दिवस आधी Maharashtra Lodge Aurangabad येथे केलेला stay....१० फेब्रुवारी २००८ ला श्याम च्या घरी त्याच्या परिवारा सोबत साजरा केलेला व त्या वेळेस काकांच्या डोळ्यामधे पाहिलेल समाधान... 28 जानेवारी २००९ ला अमित दादाला दिलेलं surprise... २९ मे २०१० ला मी अचानक पूण्यात येउन आईला आणि मित्रांना दिलेला झटका... ह्या आठवणी मी आयुष्यभर सोबत ठेवु  इच्छितो...खुप छान होते ते दिवस....

खरच आपल्या लोकांसोबत किती आनंदात जातो ना वेळ..
वाटतं जीवन सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया़....



आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...