Monday, July 30, 2012

Addicted...

Addicted
Have I told you how good
It feels to be me
When I'm in you?
I can only stay clean
When you are around
Don't let me fall, oh no

If I close my eyes forever
Would it ease the pain?
Could I breathe again?

Maybe I'm addicted
I'm out of control
But you're the drug
That keeps me from dyin'
Maybe I'm a liarG
But all I really know is
You're the only reason I'm tryin'

Enrique चे हे addicted गाणे खुप जणांनी ऐकले असेल... त्यात तो addict झाल्यावरचे परिणाम चांगल्या प्रकारे समजावुन सांगतो... या गाण्याचा reference देण्याचे कारण काय तर...आज सकाळीच मयुरशी बोलताना म्हणालो "यार तु skype n mobile से कितना addicted है".. तो नेहमी घरच्यांशी बोलत असतो..  म्हणजे त्यात काही गैर नाही पण addicted झाल्यासारखे... त्यावर तो म्हणाला की "यार पेहले वाले घर मे अकेला रेहता था ना... तो करने के लिये कुछ नही था.. तो बस skype पे घर बात होती थी.. उसकी आदत लग गई... अब मै 24 घंटा बात कर सकता हुं..." खरच एखाद्या गोष्टीच्या आहारी जाताना आपल्याला कळतही नाही की आपण त्यावर किती dependent होतो.. मी alcohol addiction, social networking addiction or cigarette addiction बद्दल नेहमीच ऐकत आलोय ... पण हे माझ्यासाठी वेगळेच होते...

व्यसन -
यस्मात्तद् व्यसति श्रेयस्तस्माद् व्यसनमुच्यते !
व्यसत्यधो वा व्रजति तस्मात्तत् परिवर्जयेत् !! कामन्दकीयनीतिसार. ref:- Dr. Nitin Kamat

The word ‘Vyasan’ is originated in Sanskrit with the root compounds ‘ Vi + As (to exist)’
Vyasan commonly inferred as an addiction to substances such as an alcohol abuse, tobacco smoking or drug dependence makes an individual lose his cognitive functions and clarity of mind. The over-indulgence of such psychoactive substances may result in physical and psychological dependence. The ultimate consequences could be - loss of pride and respect, and end result being loss of his or her own existence. I think that’s what is meant here! (source:  internet)

 सरळ सोप्या शब्दात The shloka defines the definition of the Vyasana:

In which the Vyasan i.e. inspiration to continue with the same askati strongly is then called as vyasana..|
Whereas,
Only Vyasan or Leading to the said state with pride if rides over the person the same will be the resultants could be seen..||(source:  internet)

The shloka after defining the Vyasana states that vyasana could be of any type a good or bad (e.g. Study/ Alcholism) and when this vyasan leads to its prime ends the similar results obtained could be seen.. Like a stud could be recognized as a scholar and if the pride rides over to him then he could be recognized as a Devil. Similarly a Alcholic will be recognized as a drunker and if the pride rides to him eventually will end his life..Dr. Suralkar (source:  internet)

मग थोडा विचार केला की मला कश्याचे addiction आहे, मग मलाही लक्ष्यात आले की मी पण addicted आहे...memories addicted...  To be specific 'moments spend with friends or closed ones'... तुम्ही पण कश्याच्या तरी addicted असाल.. थोडासा विचार करुन बघा...

Engineering संपल्यावर सगळे मित्र कामा निमित्त इकडे तिकडे विखुरले गेले... प्रत्येकाची life change झाली... College मधे असताना जसे गप्पांचे फड रंगायचे ते बदललं... routine नसल्यामुळे जो पर्यंत job नाही लागत तो पर्यंत घरीच वेळ जायचा... तेव्हा adjust करण्यास वेळ लागला.. 

मग job च्या ठिकाणी गेलो.. नवनवीन मित्र भेटले... त्यांच्या सोबतही खुप गमतीजमती केल्या.. नवनवी ठिकाणे फिरायचो... मजा यायची...मग त्यावेळेस जुन्या tours trips ची आठवण व्हायची... त्या वेळेस असेच वाटायचे की आपला तो जुना group च जरया ठिकाणी असला असता तर आणखीन छान वाटले असते... ह्याचा असा अर्थ नाही की नवीन मित्र bore होते...अगदी MS complete केल्यावरही तीच feeling... Manchester चे मित्रही job searching साठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले... मी सुद्धा leeds ला shift झालो... पण तरीही जुन्या मित्रांना miss करण्याची सवय गेली नाही... मग जेव्हा त्यांच्याशी mobile वर बोलणे होत असते तेव्हा त्यांना म्हणायचे की तुने यहां पे होना चाहिये था यार... बहोत ऐश करते थे....

रविवारी manchester ला गेलो होतो.. वापस leeds ला येण्यास bus 8 वाजता होती... स्टेशनवर जाण्यास जरा लवकरच निघालो..म्हटले आज थोड्या memories ताज्या कराव्यात.. चालत असताना वाटेत मग जे जे लागले त्याच्या related moments आठवु लागल्या.. Time machine असती तर कदाचीत वापस जाऊनच आलो असतो.. अश्या वेळेस मग नकळतच चेहऱ्यावर मस्त smile येते...

how good
It feels to be me
When I'm in those memories!!! Wowww

किती छान दिवस होते ते...
एक feeling येते... आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया


So Be Addicted Be Happy..

आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always

Sunday, July 15, 2012

ज्या झाडाला फळे लागतात तेच वाकलेले असते...

30 june ला wimbledon ची match बघण्यास गेलो होतो.. Practice ground वर बरेच जण practice करत होते.. त्या पैकी एक होता Novan Djokovic... World number 1player... Practice संपली व तो वापस जाण्यास निघाला... त्याचा autograph घेण्यास चाहत्यांनी बरीच गर्दी केली होती.. लोक खुप वेळा पासुन त्याची वाट बघत होते.. त्या गर्दीत मी सुद्धा होतो.. लोकांनी त्याला आवाज दिला व तो सर्वांना भेटण्यास आला... मी माझा tennis ball पुढे केला व म्हणालो thank you for the autograph n all the best for the title.. तो म्हणाला की it's my pleasure, u came here... एका सामान्या चाहत्याला त्याचे हे उत्तर... त्या उत्तरावरुन मी भारावुन गेलो.. Tennis विश्वात इतकी उंच भरारी मारुनही त्याचे पाय जमिनीवर आहेत अजुन... खुप आनंद झाला... मराठीत एक वाकप्रचार आहे की ज्या झाडाला फळे लागतात ते वाकलेलेच असते... त्याचा प्रत्यय आला आज...

अशीच एक गोष्ट Roger Federer बद्दल ऐकली आहे... Tennis पटुंचे कसे असते त्यांना जेव्हा practice करायची असते त्या आधी practice ground book करावे लागते.. Federer ground book करण्यास गेला... त्याने groundsman ला सांगितले की मला ह्या ह्या वेळेस practice करायची आहे.. Ground available असल्याने groundsman ने ते book kele... Federer वापस निघाला... जाता जाता काही अंतर पार करुन गेल्यावर त्याला आठवले की त्याने groundsman ला नावच सांगितले नाही... Federer मागे वळला groundsman जवळ गेला व म्हणाला sorry i forgot to tell my name, my name is roger federer... Groundsman म्हणाला की who doesn't know you... I have booked it already... Federer thanks म्हणुन वापस गेला... एवढे मोठे नाव असुनही त्याला हा माज नाही की माझे नाव तर सगळ्यांनाच माहिती असेल... मोठ्या लोकांचे मोठेपण लगेच ओळखु येते... उगीच लोक नाही म्हणत की he is the greatest..

मागच्या आठवड्यात manager ने party दिली हो़ती... जेवता जेवता ़तो त्याच्या पुर्वीच्या collegues बद्दल बोलत होता..  त्याचा एक collegue खुप चांगला माणुस, senior n experienced असुनही तो कधीही कोणालाही मदत करण्यास तयार.. काही जणांना जसे थोडेसे जास्त knowledge असले की बाकीच्यांना ते भावही देत नाहीत, अश्यापैकी नव्हता तो... मी म्हणालो आपल्या team मधे Russell आहे ना तो सुद्धा तसाच आहे... नेहमी knowledge share करत असतो... Team archtect आहे तो team चा.. १६-१७ वर्षाचा experience असुनही नेहमी नवनवीन गोष्टी  शिकत असतो.. मी team मधे सगळ्यात नवीन..as a fresher मी team join केली.. पण त्या माणसाने मला कधीच त्याची जाणीव होऊ दिली  नाही... एखादी गोष्ट अडली की मी त्याला विचारतो आणि तो पण कितीही काम असले तरी लगेच help करतो.. IT field मधे एखाद्या गोष्टीचे solution काढताना किती वेगवेगळ्या गोष्टीचा कसा विचार करावा हे मी त्याचा कडुन शिकत आहे... खरच ज्या झाडाला फळे लागतात ते वाकलेलेच असते... 

ह्या लोकांकडुन खुप काही शिकायला मिळते... 
वाटते आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया

आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Monday, July 2, 2012

Hello मी London Underground बोलतेय...

Title वाचुन लहानपन आठवले ना.. मराठीचे शिक्षक निबंध लिहायला सांगायचे... तसाच काहीसा हा प्रयत्न... खुप वर्ष झालेत शेवटचा निबंध लिहुन तेव्हा चुक भुल माफ असावी

मागच्या आठवड्यात London ला गेलो होतो... London आणि Mumbai या दोन्ही शहरात बरीचशी साम्ये आहेत... एक europe ची आर्थिक राजधानी तर दुसरी भारताची... दोन्ही शहरांची लोकसंख्या खुप जास्त... Top 10 most populated cities in the world च्या list मधे दोन्ही शहरांचा नंबर लागतो... जसे Mumbai मधे भारतातल्या प्रत्येक राज्यातील लोक दिसतात तसेच London मधे वेगवेगळ्या देशातील लोक भेटतील... या सारखीच अजुन एक common गोष्ट म्हणजे local trains... London मधे त्यांना underground  म्हणतात... जशी local trains मुंबईची जान आहेत तसेच underground लंडन ची.... London मधे असताना underground ने प्रवासाची ही गोष्ट..

 
Boaggie in a Tube
रविवारी Queen ची jubilee ceremony, सोमवारी british museum enjoy करून झाले.. मंगळवारी परतीचा प्रवास चालु केला... Osterly station ला गेलो... Station वर जास्त गर्दी नव्हती... बहुतेक लोकांनी long weekend* ला घरीच बसुन आराम करावा असे ठरवले असावे.. king's cross ला जाणारी piccadily line underground पकडली आणि एका रिकाम्या बोगीमधे जाउन बसलो...  King's cross station येण्यास अजुन एक तास होता.. कानाला headphones लावले आणि गाणे ऐकत बसलो... गाणे आवडीचे असल्याने आवाज थोडा मोठा होता...

तेवढ्यात एक जोरात आवाज आला "आवाज थोडा कमी करा"...असा मोठा आवाज ऐकल्यावर प्रथम भिती वाटली... मग परत एक आवाज.. "Hello मी London Underground बोलतेय... Please गाण्याचा आवाज हळु करा".. मी पहिल्यांदाच एका train ला बोलताना ऐकत होतो म्हणुन घाबरलेलो..."रोज सर्वांना मोठ्याने गाणे ऐकत असते आज वाटले की स्वतः ही जरा मोठ्याने बोलुन बघावे.. मग कळेल की बाकीच्यांना त्याचा किती त्रास होतो ते"... गाणे बंद केले आणि train च्या बोलण्याकडे लक्ष देउ लागलो...

Piccadily Line
माझे नाव piccadily underground... माझी स्थापना १९०६ मधे झाली.. रोज न थकता प्रवाश्यांना heathrow terminal 5 किंवा Uxbridge ते cockfosters station घेउन जात असते... Piccadily circus, covent garden, Harrods, Buckingham palace, Arsenal FC, King's Cross ह्या सर्व पर्यटन स्थळांना जाण्यास प्रवासी माझा उपयोग करतात...Queen ची crown ceremony पासुन ते diamond jubilee पर्यंत तिच्या सर्व प्रवासाला मी साक्षी आहे..  दोन्ही महायुद्ध असो वा recently २००७ मधे झालेले terrorist attacks असो या विनाशालाही मी अगदी जवळुन पाहिलय... London bridge is falling down कविता ऐकली असेलच... तो पडताना सुद्धा मी बघितलाय... माझे काम २४ तास ७ ही दिवस चालु असते... उनपाउस असो वा london ची हिवाळ्यातली गारेगार थंडी असो... मी नेहमी प्रवासी सेवेस तत्पर असते... 

London Tube Map
अहोरात्र सेवा करुनही मला तुम्ही माणसे नावे ठेवत असता..  मी वेळेवर काम करत नाही.. बोगी स्वच्छ नसते.. ह्या ना त्या कारणाने blame करण्याची सवयच लागली आहे तुम्हा लोकांना... एकदा काय झाले की neat maintainance न केल्याने मी स्टेशनवरच बंद पडले.. प्रवाशांना कामावर जाण्यास उशीर होउ लागला त्यातील काही जण मग मलाच रागावु लागले.. त्या आधीच्या आठवड्यात drivers नी strike केली होती.. तेंव्हा सुद्धा लोकांचा राग माझ्यावरच.. मला चालवणारी तुम्ही माणसेच... Seats ना chewing gum चिटकवुन खराब करणारी तुम्ही माणसेच... Chips packets व alcohol bottles चा कचरा करणारे सुद्धा तुम्हीच... तरीही तुम्ही मला का नावे ठेवता?

पण या सगळ्यात काही चांगली माणसे सुद्धा भेटतात.. कधी कोणाची एखादी हरवलेली वस्तु सापडली असेल तर ती lost n found center वर आणुन देतात.. वडीलधारी आणि म्हातारी व्यक्ती उभे असेल तर त्यांना बसण्यास जागा देतात.. काही कलाकार मंडळी, मग तो लेखक असो वा गायक कवी असो वा mimicry artist, कलाकृती माझ्या सोबतच पहिल्यांदा share करतो... काही जणांना त्यांची कला प्रेक्षकांसमोर सादर करण्यास train म्हणजे एक चांगला platform भेटतो तेव्हा मनाला एक वेगळेच समाधान वाटते ... काहीजण त्यांची सुख दुःख माझ्या जवळ सांगतात तेव्हा मी शांतपणे सोबत असते... त्यांच्या जीवनातले चढ उतार ऐकुन कधीकधी वाटते आपणही सजीव असतो तर...

काल परवाचाच एक incident... एका माणसाने माझ्यासमोर येउन आत्महत्या केली.. सगळी वाहतुक ठप्प झाली होती.. बाकीच्या प्रवाशांना त्याचा त्रास झाला.. खुप वाइट वाटले... विचार केला की time machine असती तर भुतकाळात वापस जाऊन त्याला वापस आणले असते व चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन त्याला दाखवले असते की जीवन किती सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया..

King's Cross Station
Train हे सगळे खुप आत्मीयतेने सांगत होती व मी पण त्यात मग्न झालो होतो... तेवढ्यात एक announcement झाली "the next station is King's Cross...blah blah blah..."... तेव्हा train ला पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने गाणे न ऐकण्याचे आश्वासन देउन मी station वर उतरलो...

पण मनात अजुनही train चे बोलणे घुमत होते...
जीवन सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया


आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...


*jubilee event मुळे सोमवारी व मंगळवारी सुद्धा सुट्टी होती